Scorpio, Thar सह या प्रसिद्ध कार देखील होणार महाग, या दिवसांपासून वाढणार किंमत
GH News March 22, 2025 01:09 AM

देशातील महत्वाची वाहन निर्मिती उद्योग असलेल्या महिंद्र एण्ड महिंद्र कंपनीने शुक्रवारी १ एप्रिलपासून एसयुव्ही आणि कमर्शियल वाहनांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या एका प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की वाहनांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय वाहनांच्या निर्मितीसाठी वाढलेला खर्चामुळे घेतलेला आहे. महिंद्र कंपनीच्या विविध एसयुव्ही आणि वाणिज्यिक वाहनांच्या किंमतीत होणारी वाढ वेगवेगळी असणार आहे.

याआधी मारुती सुझुकी इंडिया, हुंडई मोटर, टाटा मोटर्स, किआ इंडिआ, बीएमडब्ल्यू आणि होंडा कार्स इंडिया सारख्या वाहन निर्मिती कंपन्यांनी एप्रिल पासून आपल्या वाहनांची किंमत वाढविणार आहे.

SUV (स्पोर्ट्स यूटीलिटी व्हीईकल्स)

Mahindra Thar: एक दमदार आणि ऑफ-रोडिंग SUV.

Mahindra Scorpio: एक पॉप्युलर आणि मजबूत SUV,जिला लांबच्या प्रवासासाठी पसंद केले जात आहे

Mahindra Scorpio N: ही स्कॉर्पिओचे एक अपडेट व्हर्जन आहे.ज्यात जादा सुविधा आणि फिचर्स आहेत

Mahindra XUV 700: एक प्रिमीयम SUV, ज्यात आधुनिक फिचर्स आणि चांगली डिझाईन आहे

Mahindra XUV 300: एक कॉम्पॅक्ट SUV, जी खासकरुन शहरात चालविण्यासाठी योग्य आहे.

Mahindra Bolero: एक विश्वासार्ह आणि टीकाऊ SUV, जी ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही विभागात सारखीच लोकप्रिय आहे.

या वर्षी दूसऱ्यांदा किंमत वाढविली

कार कंपन्या नेहमी नवीन आर्थिक वर्षाच्या जवळपास वाहनांच्या किंमतीत वाढ करीत असतात. परंतू महिंद्रने केलेली या वर्षाची ही दुसरी किंमत वाढ आहे. या आधी जानेवारीमध्ये महिंद्रने आपल्या वाहनांच्या किंमती वाढविल्या होत्या. वाहनांच्या या किंमतीत होणारी वाढ ब्रँडच्या लाईनअपमधील सर्व मॉडेल्सवर परिणाम करणार आहे, ज्यामध्ये त्याच्या ICE ऑफरिंग्ज तसेच ऑल-इलेक्ट्रिक BE 6 आणि XEV 9e या वाहनांचा समावेश आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.