Maharashtra Live Updates : लाडक्या बहिणींना २१०० रूपये देण्याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली घोषणा
Sarkarnama March 22, 2025 05:45 AM
Eknath Shinde : राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर निधीमध्ये वाढ करणार

याबाबत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. राज्याची अर्थव्यवस्था लवकरच सुधारेल, लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रूपये देवू, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. लाडकी बहीण योजना सुरू आहे. लाडक्या बहिणींना १५०० रुपये मिळत आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर २१०० रुपये देऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.

Swargate Rape Case : पोलिसांनी केली शिवशाही बसची पडताळणी

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणी पोलिसांनी आज शिवशाही बसची पडताळणी केली. स्वारगेट एसटी बस स्थानकात एका युवतीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाला होता. त्या प्रकरणी आज शिवशाही बसची शास्त्रोक्त पद्धतीने पडताळणी करण्यात आली. शिवशाही बसमधून आवाज बाहेर येतो की नाही, याची पोलिसांनी पडताळणी केली.

NCP News : जयंत पाटील-सुनील तटकरेंमध्ये दिलखुलास संवाद

विधीमंडळाच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यात दिलखुलास संवाद झाला. या संवादादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये हास्यविनोदही होत होता. यावेळी त्यांच्या समवेत कार्यकर्तेही होते.

Mehboob Shaikh : ब्लॅकमेल करणे, हा चित्रा वाघांचा व्यवसाय : मेहबूब शेख

लोकांना ब्लॅकमेल करण्याचा भाजप आमदार चित्रा वाघ यांचा व्यवसायच आहे. त्यांनी मला बलात्काराच्या आरोपात फसविण्याचा प्रयत्न केला हेाता. मात्र, त्यांचा तो प्रयत्न फसला, असा आरोप मेहबूब शेख यांनी केला आहे.

Congress : हर्षवर्धन सपकाळ उद्या पुणे दौऱ्यावर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ उद्या शनिवारी (ता. २२ मार्च) प्रथमच पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड येथील काँग्रेसचे पदाधिकारी आणि आजी माजी लोकप्रतिनिधींची बैठक काँग्रेस भवनात होणार आहे.

Youth Congress News : कुणाल राऊत यांना धक्का

युवक काँग्रेसमधील अंतर्गत वादातून राज्यातील कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना धक्का बसला आहे. ते माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र आहेत.

धनंजय मुंडेंना करुणा शर्मांना पोटगी द्यावी लागणार?

मंत्री धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मा यांना द्याव्या लागणाऱ्या पोटगी आदेशाविरोधात दिलेल्या आव्हान याचिकेवर येत्या 29 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

अनिल परब - चित्रा वाघ पुन्हा आमने-सामने

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब आणि भाजप आमदार चित्रा वाघ पुन्हा आमने सामने आले. सभापती राम शिंदे यांच्या दालनात या दोघांनाही बोलावून घेण्यात आले होते.

समृद्धीवर टोल दरवाढ; 1 एप्रिलपासून लागू होणार नवे दर

समृद्धी महामार्गावर टोल दरवाढ होणार आहे. एक एप्रिलपासून नवी दरवाढ लागू होणार आहे.

विधानपरिषदेत पाच नवीन आमदारांचा शपथविधी

विधान परिषद पोटनिवडणूक जिंकलेल्या पाच नवीन आमदारांचा शपथविधी आज सभागृहात संपन्न झाला.

चकलांबा पोलीस खोक्याला घेणार ताब्यात

पिता-पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसले उर्फे खोक्या याला चकलांबा पोलीस ताब्यात घेणार आहेत,

Prashant Kortkar case: कोरटकराच्या अर्जाची सुनावणी सोमवारी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी संशयित प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायधीश डी. व्ही. कश्यप यांनी अटकपूर्व जामीनअर्ज नामंजूर केला आहे. त्यानंतर कोरटकरने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण उच्च न्यायालयाने अद्याप त्याला दिलासा दिलेला नाही. या प्रकरणाची सुनावणी आता येत्या सोमवारी (ता.२४)होणार आहे.

Judge Yashwant Varma live: न्यायाधीशांच्या घरी आढळलं कोट्यवधीचं घबाड

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी घरी नोटांचे ढीग आढळले आहेत. त्यांची बदली आता अलाहाबाद येथे करण्यात आल्याची माहिती आहे.

Devendra Fadnavis : CM फडणवीस रविवारी नाशिक दौऱ्यावर जाणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या कुंभमेळाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. नाशिक आणि त्रंबकेश्वरमध्ये केल्या जाणाऱ्या नियोजित कामांचा आढावा ते या दौऱ्यात घेणार आहेत. मुख्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत.

Jayakumar Gore Satara Police : जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला अटक

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी मागितल्या प्रकरणी सातारा पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेला 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेने तब्बल 3 कोटींची खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे.

Aurangzeb Tomb : संभाजीनगरमध्ये NIA ची टीम दाखल

औरंगजेब कबरीच्या वादानंतर नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर आता सर्व परिस्थीतीवर लक्ष ठेवण्यासाठी एनआयएची टीम छत्रपती संभाजीनगरात दाखल झाली आहे. तर मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, बीड, उदगीर याठिकाणी देखील एनआयएची टीम लक्ष ठेवण्यासाठी दौरा करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

University of Pune : पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा २५ मार्चपासून

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नियमित, अनुशेष लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा रीक्षा २५ मार्चपासून सुरू होणार आहेत. सर्व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांच्या परीक्षांची वेळापत्रके विद्यापीठाच्या ‘www.unipune.ac.in’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. विधी अभ्यासक्रम पदवी स्तरावरील प्रथम वर्षाच्या एलएलबी, बीए एलएलबी परीक्षांचे आयोजन महाविद्यालय स्तरावर करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे अनिवार्य आहे.

Pune News : पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का

माजी नगरसेविका कल्पना थोरवे यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. कल्पना थोरवे यांचे पती संभाजी थोरवे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. गुरूवारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

Demand to ban Chhawa Film : छावा सिनेमामुळे नागपुरातील हिंसाचार?

नागपूर येथील दोन समाजातील तणावाला कारण झाल्याचा आरोप करत छावा या बहुचर्चिच चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी मौलानांनी केली आहे. नागपूर पोलिसांच्या हाती लागलेल्या चिथावणीखोर पोस्टमध्ये छावा विरोधात केलेला प्रचार तणावाला कारण झाल्याचा आरोप करत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे बंदीची मागणी केल्याचंही मौलानांनी सांगितलं आहे. तर या सिनेमात सत्याशी फारकत घेतल्याचा आरोप देखील या पत्रातून करण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.