मुलुंडमध्ये हिंदी सामाजिक संस्थेतर्फे होळी मिलन उत्सव
मुलुंड, ता. २२ (बातमीदार) ः हिंदी सामाजिक संस्थेच्या वतीने रविवारी (ता. २३) सायंकाळी साडेपाच वाजता मुलुंड पश्चिमेतील लायन्स क्लब ऑफ मुलुंडच्या प्रांगणात होळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजक संतोष तिवारी आणि अविनाश पांडे यांनी सांगितले, की दीपक सुहाना स्टार नाइट या कार्यक्रमामध्ये ‘सारेगमप रंग पूर्वैया’चे विजेते सुजित गौतम, सुप्रसिद्ध गायक प्रिया मिश्रा, सुशील मिश्रा मासूम आपल्या मधुर लोकगीतांचे सादरीकरण करणार आहेत. या गीत- संगीत कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.