Prashant Kortkar: मुंबई हायकोर्टात दिलासा न मिळाल्याने प्रशांत कोरटकरचे दुबई पलायन?
esakal March 22, 2025 04:45 PM

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमक्या आणि छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याच्या प्रकरणात प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापुरात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणानंतर त्याच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत होते.

मुंबई हायकोर्टात दिलासा न मिळाल्याने पलायन?

प्रशांत कोरटकर याने एका प्रकरणात जमीन मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयातून तात्काळ दिलासा मिळाला नाही. सोमवारी या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवरच तो दुबईला पलायन केल्याची चर्चा आहे.

कोलकात्तामार्गे दुबईला गुपचूप प्रयाण?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कोरटकर कोलकात्तामार्गे ला पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत कोणत्याही अधिकृत यंत्रणेकडून पुष्टी मिळालेली नाही. कोलकात्ताहून आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याने दुबईकडे प्रयाण केले असावे, असे मानले जात आहे.

व्हायरल फोटोने खळबळ!

दुबईमध्ये असल्याचा दावा करणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात कोरटकर एका लक्झरी हॉटेलमध्ये असल्याचे दिसत आहे. मात्र, हा फोटो खरा आहे की नाही, याबाबत तपास सुरू आहे.

पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह?

प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली होती. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागत नसल्याने तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याच्या फरारीबाबत कोणतेही ठोस पुरावे पोलिसांकडे नसल्याचे बोलले जात आहे.

पुढील कारवाई काय?

मुंबई हायकोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे, ज्यामध्ये कोरटकरच्या फरारीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी इंटरपोलच्या माध्यमातून त्याला पकडण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचा अंदाज आहे. दुबई पोलिसांशी संपर्क साधून त्याच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू होऊ शकतात.

अमोल मिटकरी यांचं ट्विट..

कोरटकर दुबईत पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. पाताळात जरी गेला तरी याला शोधून आणणे सरकार समोरचे आता मोठे आव्हान ठरले आहे. नागपूरवरून थेट दुबई गाठण्याकरिता कोरटकरने दंगलीचा आधार घेऊन पळ काढल्याचे एकंदरीत दिसते. गृह खात्याने त्याला तात्काळ मुसक्या आवळुन भारतात आणावे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.