Twitter’s Iconic Bird Logo Sold: तुम्हाला ट्विटरचा जुना ब्लू बर्ड लोगो आठवत असेल (आता X), जो एकेकाळी ट्विटरची ओळख होता. तो आयकॉनिक लोगो आता 29 लाख रुपयांना विकला गेला आहे. हा लोगो कंपनीच्या सॅन फ्रान्सिस्को मुख्यालयातून इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यानंतर आणि 'X' असे रीब्रँड केल्यानंतर काढून टाकण्यात आला होता.
254 किलो वजनाच्या आकाराच लोगो $34,375 मध्ये विकत घेतलेल्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. दुर्मिळ आणि ऐतिहासिक वस्तूंच्या विक्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या आरआर ऑक्शनने हा लिलाव आयोजित केला होता.
2022मध्ये इलॉन मस्कने कंपनी ताब्यात घेतल्यानंतर 2023च्या लिलावातही हा लोगो विकला गेला होता. लिलावात, कॉफी टेबल, बिअर टॅप आणि ट्विटर-थीम असलेली पुतळ्यासह इतर वस्तूही हजारो डॉलर्समध्ये विकल्या गेल्या आहेत.
आरआर ऑक्शनने आयोजित केलेल्या या लिलावात केवळ लोगोच नाही तर तंत्रज्ञानाशी संबंधित ऐतिहासिक वस्तूही लाखो डॉलर्सला विकल्या गेल्या. Apple-1 संगणक (ॲक्सेसरीजसह) $3,75,000 ला विकला गेला. त्याचप्रमाणे, स्टीव्ह जॉब्सने 1976 मध्ये सही केलेला चेक $1,12,054 मध्ये विकला गेला, तर पहिल्या पिढीचा 4GB iPhone (सीलबंद पॅकेजमध्ये) $87,514 ला विकला गेला.
ट्विटरच्या पक्षी लोगोचा इतिहासट्विटरचा प्रसिद्ध ब्लू बर्ड लोगो हा ओळखण्यास सहजसोपा आणि जगभर प्रसिद्ध आहे. ट्विटरच्या स्थापनेपासून या लोगोमध्ये अनेक बदल झाले आहेत. जेव्हा ट्विटरची स्थापना झाली (मार्च 2006) तेव्हा कंपनीकडे कोणताही लोगो नव्हता. त्यावेळी फक्त Twitter हा शब्द ब्राइट ब्लू रंगात लिहिला जात असे.
2010 मध्ये ट्विटरने पहिल्यांदा ब्लू बर्ड लोगो प्रसिद्ध केला. हा पक्षी "लॅरी द बर्ड" या नावाने ओळखला जात असे. या पक्ष्याची रचना बास्केटबॉल खेळाडू लॅरी बर्ड याच्या नावावरून करण्यात आली होती.
2012 मध्ये त्याच्या लोगोमध्ये मोठा बदल केला. पक्ष्याचे पंख वर उचलले गेले, त्याचा डोक्याचा आकार बदलला आणि एक साधा लोगो तयार करण्यात आला. याला "ट्विटर बर्ड" असे नाव दिले गेले.
2023 मध्ये, ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी मोठा बदल करत ट्विटरचा लोगो काढून टाकला आणि त्याऐवजी "X" हा नवीन लोगो सादर केला. त्यामुळे ट्विटरचा प्रसिद्ध निळ्या पक्ष्याचा लोगो इतिहासजमा झाला.