RCB vs KKR : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात हे खेळाडू ठरतील बेस्ट! या 11 प्लेयर्सकडे सामना फिरवण्याची ताकद
GH News March 22, 2025 09:11 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स संघ आणि रजत पाटिदारच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ मैदानात उतरणार आहे. आयपीएल स्पर्धेची सुरुवात या दोन दिग्गज संघाच्या सामन्यापासून होणार आहे. कोलकात्याचा संघ कायम आरसीबीवर वरचढ ठरला आहे. दोन्ही संघ आयपीएलमध्ये 34 वेळा आमनेसामने आले आहेत. यात केकेआरने 20 विजय, तर आरसीबी 14 सामन्यात विजय मिळवला आहे. गेल्या पाच सामन्यांमध्ये केकेआरने चार वेळा विजय मिळवला आहे. आरसीबीचा केकेआरविरुद्ध शेवटचा विजय आयपीएल 2022 मध्ये झाला होता.त्यामुळे कोलकात्याचं पारडं जड आहे. पण मेगा लिलावानंतर संघात बरेच बदल झाले आहेत. त्यात फॉर्मदेखील महत्त्वाचा आहे. ईडन गार्डन्सवर विराट कोहलीचे टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन असेल. गेल्या वर्षी भारताच्या टी20 विश्वचषक विजयानंतर निवृत्ती घेतली होती. ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे. सपाट ट्रॅक आणि सतत उसळी घेणारी खेळपट्टी असल्याने फलंदाज आत्मविश्वासाने त्यांचे शॉट्स खेळू शकतात.

या सामन्यात सर्वांच्या नजरा या सुनील नरीनकडे असतील. मागच्या पर्वात त्याने धमाकेदार खेळी केली होती. फलंदाजी आणि गोलंदाजीत कमाल करू शकतो. तसेच आरसीबीचा फिल सॉल्ट हा देखील फलंदाजीत गोलंदाजांची पिसं काढू शकतो. त्यामुळे या सामन्यात या दोन खेळाडूंकडे नजरा असतील. क्विंटन डी कॉक, फिल सॉल्ट, विराट कोहली, वेंकटेश अय्यर, रजत पाटिदार, सुनील नरीन, आंद्रे रसेल, कृणाल पांड्या, जोश हेझलवूड, वरुण चक्रवर्ती आणि हार्षित राणा या सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकता. हे खेळाडू कोणत्याही क्षणी सामन्याचं स्थिती बदलण्याची ताकद ठेवतात.

दोन्ही संघाचे खेळाडू

केकेआर संघ: अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रोवमन पॉवेल (विकेटकीपटू), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), लुवनिथ सिसोदिया (विकेटकीपर), मनीष पांडे, आंग्रस रघुवंशी, रमणदीप सिंग, आंद्रेई अली, सनील, सनील, रमन, रविंद्र सिंह, रवीन अली, एन. रॉय, वैभव अरोरा, स्पेन्सर जॉन्सन, मयंक मार्कंडे, एनरिक नोर्टजे, उमरान मलिक, वरुण चक्रवर्ती.

आरसीबी संघ : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, जोश हेझलवूड, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक दार, सुयश शर्मा, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, नुवान थुशरा, देवकोब, नुवान बेहंडल, देवकोट, कृणाल. पडिक्कल, स्वस्तिक चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.