Latest Marathi News Updates : चार पिस्टल व आठ जिवंत काडतूसांसह चार सराईत गुन्हेगार पुण्यात जेरबंद
esakal March 23, 2025 04:45 PM
चार पिस्टल व आठ जिवंत काडतूसांसह चार सराईत गुन्हेगार पुण्यात जेरबंद

वाघोलीतील खंडणी विरोधी पथक दोनने बकोरी रोडवरील एका सदनिकेवर छापा टाकून चार सराईत गुन्हेगार, चार पिस्टल व आठ जिवंत काडतुसासह जेरबंद केले.  त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

Mumbai Live : नागपूरच्या दंगलीनंतर आता मुंबई पोलीस अलर्ट मोडवर

नागपूर शहरात दोन गटात झालेल्या दंगलीच्या घटनेनंतर आता मुंबई पोलीस अलर्ट मोडवर

मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांकडून मरोळ माफखान नगर या संवेदनशील भागात मॉकड्रिल आणि रूट मार्च करण्यात आला.

रमजान ईद आणि गुढीपाडवा सणानिमित्ताने मुंबई पोलिसांकडून संवेदनशील भागामध्ये दंगल विरोधी पथक कडून मॉकड्रिल करण्यात आला.

मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एमआयडीसी आणि अंधेरी पोलिसांकडून मरोळ मापखान परिसरात हे मॉकड्रिल करण्यात आला.

या मॉकड्रिल मध्ये अंधेरी आणि एमआयडीसी पोलिसांचे जवळपास 60 ते 70 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सोबत अग्निशमन दलाचे जवान उपस्थित

दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस त्या ठिकाणी पोहचवून परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवता येते या मॉकड्रिल च्या माध्यमातून पोलिसांकडून प्रयत्न.

Mumbai Live : अजित पवारांनी डोळे चेक करण्याचा नवा धंदा सुरु केलाए का? - राणे Nagpur Live : नागपूर दंगलीत गेला पहिला बळी; जखमी तरुणाचा रुग्णालयात मृत्यू

नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळं नागपूर दंगलीचा हा पहिला बळी ठरला आहे. इरफान अन्सारी असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.

Live: अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना २०२५ चा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान

- ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना अर्थशास्त्र क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानाबद्दल २०२५ या वर्षाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर.

- २ लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप.

Live: इटलीतील रोम येथे १३ वी भारत-इटली लष्करी सहकार्य गट बैठक संपन्न

- इटलीतील रोम येथे १३ वी भारत-इटली लष्करी सहकार्य गट बैठक संपन्न

- द्विपक्षीय लष्करी सहकार्य वाढवण्यासाठी देवाणघेवाण कार्यक्रम, क्षमता विकास आणि संरक्षण गुंतवणूक यासह महत्त्वपूर्ण चर्चा.

- दोन्ही देशांनी धोरणात्मक संबंध दृढ करण्याची वचनबद्धता दर्शवली.

Mumbai Live: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत गोंधळ, संतप्त सदस्यांचे ठिय्या आंदोलन

मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक अधिसभेच्या (सिनेट) बैठकीला आज मोठ्या गोंधळात सुरुवात झाली. सकाळी सभेसाठी येणाऱ्या सिनेट सदस्यांच्या गाड्या अडवल्याने ते आक्रमक झाले आणि विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात काळे कपडे घालून निषेध नोंदवला. युवासेना पदवीधर सिनेट सदस्य आणि बुक्टू प्राध्यापक संघटनेने विद्यापीठाच्या मनमानी कारभारावर जोरदार आक्षेप घेतला असून, सिनेट पूर्व बैठकीवर बहिष्कार टाकल्यानंतर आता प्रत्यक्ष अधिसभेत प्रशासनाला जाब विचारत आहेत. दुपारपर्यंतच्या कामकाजात दोन वेळा निलंबनाची धमकी दिल्यानंतर संतप्त सिनेट सदस्यांनी वेलमध्ये उतरून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

Nashik Live- नाशिक जिल्ह्यात १ एप्रिलपर्यंत शस्त्र आणि जमावबंदी आदेश जारी

नाशिक जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १ एप्रिलपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी सण-उत्सव, ईद आणि नागपूरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला असून, या कालावधीत सभा व मिरवणुकांसाठी प्रशासनाची परवानगी आवश्यक असेल.

Live Updaste: नेतुम्बो नंदी-नदैतवाह यांनी नामिबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली

नेतुम्बो नंदी-नदैतवाह यांनी नामिबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

Devendra Fadnavis Live Updaste: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'नवसखी जिल्हास्तरीय सरस प्रदर्शना'चे उदघाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'नवसखी जिल्हास्तरीय सरस प्रदर्शना'चे उदघाटन

Live Updates: कोरटकरांना पोलिसांनीच लपवल-अमोल मिटकरी

कोरटकरांना पोलिसांनीच लपवल असे अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

Nagpur Live Updates: नवसखी सरस महोत्सवाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं

नागपुरातील दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात दोन दिवस चालणाऱ्या नवसखी सरस महोत्सवाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

औरंगजेबाच्या कबरीविरोधात याचिका, राष्ट्रीय विशेष दर्जा हटवण्याची मागणी

संभाजी नगर येथील औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेत पुरातत्व विभागाने कबरीला दिलेला राष्ट्रीय विशेष दर्जा हटवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. औरंगजेब मूळ भारतीय नव्हता, त्यामुळे त्याच्या कबरीला ऐतिहासिक वारसा म्हणून मान्यता देणे योग्य नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

Share Market : फक्त पाच दिवसांच्या तेजीनं चार वर्षांचं रेकॉर्ड मोडलं

भारतीय शेअर बाजारात ऑक्टोबर 2024 पासून सुरु असलेली घसरण थांबत असल्याचे संकेत मिळत आहेत. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात पुन्हा खरेदी सुरु केल्यानं आणि कमी किमतीवर शेअर खरेदी मोठ्या प्रमाणावर झाल्यानं शेअर बाजारात तेजी परतली  आहे. 17 मार्च ते 21 मार्च या काळात सलग पाच दिवसांमध्ये तेजी पाहायला मिळाली. या पाच दिवसांच्या तेजीनं शेअर बाजाराचं चार वर्षांचं रेकॉर्ड मोडली आहे.

Nagpur Live: 'चिल्लर' प्रशांत कोरटकरच्या शोधात कोल्हापूर पोलिसांची दोन पथकं नागपुरात

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विरोधात गरळ ओकून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देऊन फरार झालेला प्रशांत कोरटकरचा कोल्हापूर पोलिसांची दोन पथके त्याचबरोबर नागपूर पोलिसांकडून सुद्धा शोध सुरु असताना सापडलेला नाही. त्यांचा अंतरिम जामीन फेटाळण्यात आला आहे. त्याला मुदतवाढ सुद्धा नाकारण्यात आली आहे. 

Pune : पोलीस स्टेशनसमोरच्या झाडावरून माथेफिरूने मारली उडी

- हडपसर पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या वडाच्या झाडावरून माथेफिरू तरुणाने मारली उडी.

- मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेला 24 वर्षे तरुण आज पहाटे चढला होता झाडावर.

- झाडावर चढलेल्या तरुणाने मुख्यमंत्र्याची भेट व्हावी अशी मागणी केली होती.

- नागरिकांनी त्याला खाली उतरण्यास विनंती केली असता तरुणाने झाडावर मारली उडी

Pune News : पुण्यात मध्यरात्री गोडाऊनला आग, जिवीतहानी नाही

काल मध्यराञी एकच्या सुमारास शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर एका मालाचा साठा असणाऱ्या गोडाऊनमध्ये आग लागली होती. अग्निशमन दलाची सहा वाहने व जवान यांनी आगीवर नियंञण मिळवत आग पुर्ण विझवली. जखमी कोणी नाही

अजितदादा आणि शरद पवार यांच्या बैठकीवरून संजय राऊतांची टीका

शरद पवार अजित पवार यांच्यातील वसंतदादा शुगर इंट्युटट मधल्या बैठकीवर संजय राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले की, यांच्याकडे भेटीसाठी विद्याप्रतिष्ठान असतं. रयत शिक्षण संस्था आहेत. वसंतदादा इंस्ट्युट असतं. आमच्याकडे अशा संस्था नाहीत. राजकारणात संवाद ठेवला पाहिजे या दांभिक गोष्टीवर आमचा विश्वास नाही.

Pune : अजित पवार अन् जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा, शरद पवारांसोबत बैठकी आधी काय घडलं?

पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक सुरू आहे. या बैठकीला अजित पवार, शरद पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर पदाधिकारीही उपस्थित असणार आहेत. बैठकीआधी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समजते.

Live : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांचं ट्विट..

कोरटकर दुबईत पळून गेल्याची माहिती समोर. पाताळात जरी गेला तरी याला शोधून आणणे सरकार समोरचे आता मोठे आव्हान ठरले आहे. नागपूरवरून थेट दुबई गाठण्याकरिता कोरटकरने दंगलीचा आधार घेऊन पळ काढल्याचे एकंदरीत दिसते. गृह खात्याने त्याला तात्काळ मुसक्या आवळुन भारतात आणावे. आमदार अमोल मिटकरी यांची ट्विटद्वारे मागणी -

Live : नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक

नागपूरमध्ये झालेला हिंसाचार हा नियोजनबद्धच असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. सोमवारी रात्री नागपूरमधील महाल भागात हिंसाचार उफळला होता, हा हिंसाचार नियोजनबद्ध असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आणखी दोघांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे. 

Live : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची रेकी करणाऱ्या रईस शेखचा जामीन फेटाळला

- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची रेकी करणाऱ्या रईस शेखचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला आहे

- "जैश ए मोहम्मद" या दहशतवादी संघटनेची निगडित असून तो संपर्कात होता अशी पुरावे पोलिसांनी सादर केले.

- रईस शेख ने 15 जुलै 2021 मध्ये नागपूर रेकी केल्याच पोलीस तपासत समोर आले होते... त्यानंतर तो कश्मीरला निघून गेला होता.

- त्यांनी रेकी दरम्यान संघ मुख्यालय आणि हेडगेवार स्मृती भवन या ठिकाणचे फोटो व्हिडिओ काढून दहशतवादी संघटनांना पाठवले असल्याचा आरोप आहे.

- पोलीस तपासात त्याचे संबंध आतंकवादी संघटनाशी असल्याने तो सध्या कारागृहात आहे. त्यांनी जामीन्यासाठी अर्ज केला असता रईसला जामीन देऊ नये अशी विनंती पोलिसानी न्यायालयाला केली होती.

- दहशतवादी संघटनेची संपर्कात असल्याच्या आधारावर नागपूर खंडपीठाने हा जामीन फेटाळला.

Karnataka Bandh : बस कंडक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज कन्नड संघटनांकडून कर्नाटक बंदची हाक

बेळगाव येथे मराठी न बोलल्याबद्दल बस कंडक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज अनेक कन्नड संघटनांनी राज्यात सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंदची हाक दिली आहे. यादरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Pune Municipal Corporation LIVE : पाण्याचा अधिक वापर केल्यास सोसायट्यांचे नळ कनेक्शन तोडणार; ⁠पुणे महापालिकेचा नागरिकांना इशारा

पाण्याचा अधिक वापर केल्यास सोसायट्यांचे नळ कनेक्शन तोडणार, असा इशारा ⁠पुणे महापालिकेने नागरिकांना दिला आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. महापालिकेकडून शहरात समान पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पालिकेकडून शहरातील पाणीपुरवठ्याचे १४१ झोन तयार करण्यात आले आहेत. त्यातील ४७ झोन तयार झाले आहेत. तर, ४१ झोनमध्ये मीटरद्वारे मुख्य टाकीतून सोडण्यात आलेले पाणी, सोसायटीच्या टाकीत पडलेले पाणी याची मोजणी केली जात आहे. त्यानुसार, प्रती व्यक्ती १३५ लीटरप्रमाणे सोसायटीने पाणी घेणे आवश्यक आहे. मात्र, काही सोसायट्यांचा पाणी वापर ५०० ते ६०० लीटर पेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे.

Bangalore Police : हॉटेल पुरवठादाराच्या बॅगेत सापडला हातबॉम्ब

बंगळूर : येथील वैभव हॉटेलच्या (Vaibhav Hotel) पुरवठादाराच्या बॅगेत हातबॉम्ब सापडला. यामुळे घाबरून हॉटेल कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना (Bangalore Police) कळवले. पोलिसांनी परिसराची पाहणी केली. हातबॉम्ब (ग्रेनेड) आणि हॉटेल पुरवठादार अब्दुल रहमान याला ताब्यात घेतले आणि सखोल चौकशी केली.

Kolhapur News : पालकमंत्री आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर

कोल्हापूर : पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आज (ता. २२) पासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.पालकमंत्री आबिटकर यांचे आज सकाळी सात वाजता शाहू महाराज टर्मिनस येथे आगमन होईल. मोटारीने शासकीय विश्रामगृह येथे जातील. सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथून मोटारीने वाळवा (जि. सांगली) कडे प्रयाण होईल. सायंकाळी सहा वाजता यशोलक्ष्मी मंगल कार्यालय, इचलकरंजी येथे ए. आर. तांबे यांच्या एकसष्टी अभीष्टचिंतन सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहतील. मंत्री हसन मुश्रीफ उद्या (ता. २२) सकाळी ७.२० वाजता महालक्ष्मी एक्स्प्रेसने आगमन, तेथून कागल निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी आठ वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी ११ वाजता गडहिंग्लज येथे एचपीव्ही लसीकरणसंदर्भात आढावा बैठक.

Shiravane MIDC Fire : शिरवणे MIDC परिसरात आग विझवण्याचे काम अद्याप सुरूच

शिरवणे येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) परिसरात आग विझवण्याचे काम अद्याप सुरूच आहे. काल रात्री 11 वाजताच्या सुमारास ही आग लागली आहे.

Buddhist Dhamma Parishad LIVE : महाबोधी महाविहार मुक्तीसाठी रविवारी बौद्ध धम्म परिषद, रॅली

सांगली : ‘‘बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क’तर्फे वामन मेश्राम यांच्या निर्देशानुसार महाबोधी विहार मुक्ती आंदोलन उभारण्यात आले आहे. याच मोहिमेअंतर्गत बौद्धधर्म कार्य समन्वय समितीतर्फे रविवारी (ता. २३) बौद्ध धम्म परिषद आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे,’’ अशी माहिती संयोजक सुजाता पवार, सचिन कांबळे, संतोष आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सकाळी नऊ ते सायंकाळी पाचदरम्यान परिषद होणार आहे.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून बंदी आदेश जारी, काय आहे कारण?

कोल्हापूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २२ मार्च सकाळी सहा वाजल्यापासून ते तीन एप्रिलच्या रात्री बारापर्यंत बंदी आदेश जारी केला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी हे आदेश दिले आहे. जिल्ह्यात विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन, उपोषण, मोर्चा अशा प्रकारचे आंदोलन करण्यात येत आहे. विविध पक्षांकडून रॅली, सभेचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात यात्रा, सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.

BJP MLA LIVE : कर्नाटक विधिमंडळात गदारोळ; भाजपचे १८ आमदार निलंबित

बंगळूर : कागदपत्रे फाडून फेकून देत कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांचा अनादर केल्याबद्दल अध्यक्ष यू. टी. खादर यांनी भाजपच्या १८ आमदारांना पुढील सहा महिन्यांसाठी शुक्रवारी निलंबित केले. विधानसभेत आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. दरम्यान, गोंधळातच राज्याचा अर्थसंकल्प आणि आमदारांचे वेतन वाढविण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला.

Judge Yashwant Verma Live : न्यायाधीश यशवंत वर्मांच्या दिल्लीतील निवासस्थानी सापडले पंधरा कोटी रुपयांचे घबाड

Latest Marathi Live Updates 22 March 2025 : कागदपत्रे फाडून फेकून देत कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांचा अनादर केल्याबद्दल अध्यक्ष यू. टी. खादर यांनी भाजपच्या १८ आमदारांना पुढील सहा महिन्यांसाठी निलंबित केले. तर, सरकारी कंत्राटी कामांमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देणारे विधेयक कर्नाटक विधानसभेत कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर करण्यात आले. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सापडलेल्या कथित पंधरा कोटी रुपयांच्या घबाडावरून आता संशयाचा धूर निर्माण झाला आहे. ‘कुठल्याही क्रांतीची सुरुवात ही संघर्षातूनच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या माणगावच्या ऐतिहासिक परिषदेपासूनच देशात सामाजिक क्रांतीला सुरुवात झाली’, असे मत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करू नका, अशी मागणी ब्लॅक पँथर पक्षाच्या शिष्टमंडळाने आज केली. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात आता बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.