आयपीएल 2025 स्पर्धेच्या दुसऱ्याच सामन्यात आक्रमक खेळीचं दर्शन घडलं. एकापेक्षा एक सरस फलंदाज असलेल्या सनरायझर्स हैदराबादने अपेक्षेप्रमाणे फलंदाजी केली. खरं तर त्यांची बॅटिंग लाईनअप पाहता त्यांना प्रथम फलंदाजी देणं हा गुन्हाच होता. पण असं असूनही नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद आरामात 200 पार धावा करणार हे अपेक्षित होतं. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. ट्रेव्हिस हेडने 31 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. तर इशान किशनने वन डाऊन येत शतकी खेळी केली. आयपीएल कारकिर्दितलं पहिलं शतक ठोकलं. त्याने 47 चेंडूत 11 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 106 धावा केल्या. तर क्लासेन आणि नितीश रेड्डीने 30 पेक्षा अधिक धावा कमी चेंडूत केल्या. त्यामुळे 20 षटकात 6 गडी गमवून 286 धावा केल्या आणि विजयासाठी 287 धावा दिल्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघ 242 धावांपर्यंत मजल मारू शकला. तसेच 44 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
कर्णधार रियान पराग म्हणाला की, माझ्या अपेक्षेप्रमाणेच ते कठीण होते. सनरायझर्स हैदराबादला श्रेय पण आम्ही अधिक चांगली कामगिरी करू शकलो असतो. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आम्ही एकत्रितपणे घेतला. तो योग्य निर्णय होता पण तो अधिक चांगल्या कामगिरीबद्दल होता. जर 280 धावांमुळे फरक पडला. टॉसमध्ये मी म्हटले होते की 200 धावा अपेक्षित होत्या. पण 220-240 धावा पण चालल्या असत्या. ध्रुव आणि संजूने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती उत्तम होती. हेटमायर आणि शिवम यांनीही नंतर चांगली फलंदाजी केली. तुषारने खरोखर चांगली गोलंदाजी केली. संदीप शर्माने चांगली कामगिरी केली. विजय मिळो किंवा नाही, आपण शिकतो आणि नंतर आपण विसरतो.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी.