आयपीएलच्या 18 व्या मोसमात मुंबईचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा अपयशी ठरला. रोहित एमए चिदंबरम स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या लौकीकाला साजेशी खेळी करु शकला नाही. रोहितला भोपळाही फोडता आला नाही. रोहित चौथ्या बॉलवर एकही धाव न करता आऊट झाला. रोहितला चेन्नईच्या खलील अहमद याने शिवम दुबे याच्या हाती कॅच आऊट केलं. रोहितकडून मुंबईच्या चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र रोहितने निराशा केली. रोहितला मोठी खेळी सोडा, एक धावही करता आली नाही. यासह रोहितच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. रोहितने दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
रोहितची आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात झिरोवर आऊट होण्याची ही 18 वी वेळ ठरली. रोहितचा यासह आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत समावेश झाला. रोहितआधी दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोघे प्रत्येकी 18-18 वेळा खातं उघडण्यात अपयशी ठरले. तसेच या यादीत दुसर्या स्थानी पीयूष चावला आणि सुनील नारायण हे दोघे विराजमान आहेत. चावला आणि सुनील हे दोघे प्रत्येकी 16-16 वेळा झिरोवर आऊट झाले आहेत.
दरम्यान खलील अहमद याची रोहित शर्माला आऊट करण्याची ही तिसरी वेळ ठरली. रोहितला आयपीएलमध्ये खलीलविरुद्ध संघर्ष करावा लागला आहे.रोहितने खलीलविरुद्ध एकूण 43 चेंडूंचा सामना केला आहे. रोहितला या 43 चेंडूंमध्ये खलीलविरुद्ध 28 धावाच करता आल्या आहेत. रोहितने या दरम्यान 9.33 च्या सरासरीने आणि 65.12 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत.
रोहित 18 व्यांदा झिरोवर आऊट
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, रॉबिन मिन्झ, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि सत्यनारायण राजू.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, दीपक हुडा, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, सॅम करन, एमएस धोनी (विकेटकीपर), आर अश्विन, नूर अहमद, नॅथन एलिस आणि खलील अहमद.