इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील दुसरा सामना २३ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व युवा रियान परागने केले. त्यामुळे तो आयपीएलमध्ये नेतृत्व करणारा चौथ्या क्रमांकाचा सर्वात युवा कर्णधार ठरला.
हा सामना झाला त्यावेळी रियानचे वय २३ वर्षे १३३ दिवस होते. मात्र त्याच्यासाठी नेतृत्वाची सुरुवात पराभवाने झाली.
आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत रियानने श्रेयस अय्यरला मागे टाकले.
अय्यरने २३ वर्षे १४२ दिवस वय असताना २०१८ साली आयपीएलमध्ये पहिल्यांदा दिल्ली कॅपिटल्सचे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध नेतृत्व केले होते.
या विक्रमाच्या यादीत रियान आणि श्रेयसच्या वर तिसऱ्या क्रमांकावर सुरेश रैना आहे. त्याने २०१० साली २३ वर्षे ११२ दिवस वय असताना चेन्नई सुपर किंग्सचे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिल्यांदा नेतृत्व केले होते.
दुसऱ्या क्रमांकावर स्टीव्ह स्मिथ आहे. त्याने २०१२ मध्ये पुणे वॉरियर्स इंडियाकडून २२ वर्षे ३४४ दिवस वय असताना आयपीएलमध्ये पहिल्यांदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध नेतृत्व केले होते.
आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात नेतृत्व करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने २०११ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंळुरुचे २२ वर्षे १८७ दिवस वय असताना पहिल्यांदा राजस्थान रॉयल्सविरुद्ध नेतृत्व केले होते.