MNS Politics : मनसेमध्ये संघटनात्मक बदल; पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी फिरविली भाकरी
esakal March 24, 2025 09:45 AM

मुंबई : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमधील अपयशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पक्षाच्या नेत्यांवर जबाबदारी दिली आहे. विशेष बाब म्हणजे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यावर गटप्रमुख आणि शाखाध्यक्ष यांच्या कामाचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात अली आहे.

रवींद्र नाट्य मंदिरात आज झालेल्या बैठकीत पक्षसंघटनेत बदल करण्यात आले. पक्षाचे शहराध्यक्ष तसेच चार शहर उपाध्यक्षांची नियुक्ती या बैठकीत करण्यात आली आहे.

विधानसभेत खोकेभाई

राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना एका खोक्या भाईचे काय घेऊन बसलात, येथे संपूर्ण विधानसभेत खोके भाई भरलेत, असा टोला राज ठाकरेंनी सरकारला लगावला. आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले ऊर्फ खोक्याला मारहाणीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी हा टोला लगावला.

मुंबईतील जबाबदाऱ्या
  • संदीप देशपांडे : मुंबई शहर अध्यक्षपद

  • यशवंत किल्लेदार : दक्षिण मुंबईचे शहर उपाध्यक्ष

  • कुणाल माईणकर : पश्चिम उपनगर शहर उपाध्यक्षपद

  • योगेश सावंत : पूर्व उपनगर भागाचे शहर उपाध्यक्ष

  • अमित ठाकरे : गटप्रमुख आणि शाखाध्यक्ष प्रमुख

  • नितीन सरदेसाई : विभाग अध्यक्ष प्रमुख

  • बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर : केंद्रीय समितीचे प्रमुख

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.