Latest Maharashtra News Updates: डॉ. होमी भाभा विद्यापीठाचा चौथा दीक्षांत समारंभ, राज्यपाल राधाकृष्णन यांची उपस्थिती
esakal March 26, 2025 03:45 AM
Mumbai Live: डॉ. होमी भाभा विद्यापीठाचा चौथा दीक्षांत समारंभ, राज्यपाल राधाकृष्णन यांची उपस्थिती

- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा चौथा वार्षिक दीक्षांत समारंभ मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात संपन्न.

Live: सिंगापूर मेरीटाईम वीक 2025: केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची सिंगापूर क्रूझ सेंटरला भेट

- सिंगापूर मेरीटाईम वीक 2025 अंतर्गत केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सिंगापूर क्रूझ सेंटर ला भेट दिली.

- भारत-सिंगापूर 60 वर्षांच्या राजनैतिक संबंधांचा उत्सव साजरा करताना, या भेटीने सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला.

Live : जयकुमार गोरे प्रकरणात पवारांच्या पक्षाचा हात - मुख्यमंत्री फडणवीस

जयकुमार गोरे प्रकरणात शरद पवारांच्या पक्षाचा हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. आरोपी असलेल्या तुषार खरातच्या संपर्कात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार असल्याचं त्यांनी म्हटलं.

Live : पुण्यात जिल्हा परिषदेसमोर नोटा फेक आंदोलन

पुण्यात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांच्या विरोधात अनिल शिरसाट यांनी नोटा फेकत आंदोलन केलं. भ्रष्टाचाराविरुद्ध हे आंदोलन केल्याची चर्चा आहे.

Live : पुणे प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शहराध्यक्ष

मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांनी रोहित दादा पवार यांच्यावर केलेले आरोप निराधार

राज्याचे मुख्यमंत्री आपल्या एका मंत्राला वाचवण्यासाठी कसा चुकीचा पोरखेळ करतात याच्यावरती शिक्कामोर्तब करणार आहेव

मंत्री जयकुमार गोरे शंभर टक्के चुकलेले आहेत

मात्र जयकुमार गोरे बाबत न्यायालय योग्य निर्णय घेईल

या प्रकरण डायव्हर्ट करणारा प्रयत्न आहे त्या महिलेची खंडणी प्रकरणात अटकेत आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांना वाचवा मात्र अशा प्रकारचे आरोप करणे चुकीचा आहे

सुप्रिया सुळे.चुकीचे वागणार नाहीत

इथून पुढे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाला शोभेला अशी भाषा करावी

Live : अभिनेता सोनू सुदची पत्नी समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात झाली गंभीर जखमी

अभिनेता सोनू सूदची पत्नी सुनीताच्या गाडीचा नागपूरमध्ये समृद्धी महामार्गावर अपघात झाला असून ती जखमी झाली आहे. हा अपघात भीषण असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Pune Live : दौंड मध्ये कचऱ्यात सापडलेल्या अर्भक प्रकरणाची महिला आयोगाने घेतली दखल

पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात बोरावकेनगर मध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भक व मानवी अवशेष सापडल्याची बातमी माध्यमातून समोर आली आहे. सद्यस्थितीत दौंड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून डॉक्टरांच्या पथकामार्फत तपासणी केली आहे. पोलिसांनी याचा तपास व रुग्णालयाची चौकशी सुरू केली आहे. हे मानवी अवशेष रुग्णालयाकडे अभ्यासासाठी २०२० पासून आहेत आणि नजरचुकीने कचऱ्यात गेले अशी प्राथमिक माहिती आहे. राज्य महिला आयोग तातडीने तपास पूर्ण करण्याच्या सूचना देत वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत

Live : नांदेडमध्ये महिला शिक्षिकेकडून आत्मदहणाचा प्रयत्न

शिक्षक समन्वय संघ जिल्हा नांदेडच्या वतीने आंदोलन.

महिला शिक्षिकेने केला आत्मदहणाचा प्रयत्न.

प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सामूहिक आत्मदान आंदोलन

आंदोलन करणाऱ्या अंशतः अनुदानित शिक्षिकेची पोलिसांसोबत झटापट, पोलिसांनी घेतलं ताब्यात

नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारचे विरोधात जोरदार घोषणाबाजी

यापूर्वी सुद्धा केलं होतं जलभरो आंदोलन

Live : पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा

फुरसुंगी कचरा डेपो बाधित भागात गेले कित्येक वर्षी पाणी प्रश्न सुटत नाही म्हणून ग्रामस्थांनी काढला मोर्चा

मोर्चात मोठ्या संख्येने महिला हंडा घेऊन सहभागी

हंडा वाजवत केलं आंदोलन

गेले अनेक दिवस टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळत नाही,त्याच बरोबर रस्ता लाईट समस्या मोठ्या प्रमाणात आहेत.

या वेळेला आम्ही अनेक समस्या पत्र उपजिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत त्यावर त्यांनी लवकरच तोडगा काढू असं सांगितलं आहे.

जर आमच्या प्रश्नावर तोडगा नाही निघाला तर आम्ही यापेक्षा उग्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय.

CM Fadnavis Live : गुन्हेगारीविरोधात ठोस पावलं उचलली जात आहेत : मुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्रातील शहरे देशाच्या टॉप १० सुरक्षित शहरांमध्ये नाहीत. गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी कडक उपाययोजना सुरू. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ठोस पावलं उचलली जात आहेत,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Mumbai Live : दिशा सालियनचे वडील पोलिस आयुक्तांच्या भेटीला

दिशा सालियनचे वडील पोलिस आयुक्तांच्या भेटीला

Kolhapur Live : कोल्हापुरात चपला घेऊन शिवसैनिक आक्रमक

कोरटकर प्रकरणात कोल्हापुरात चपला घेऊन शिवसैनिक आक्रमक झाले आहेत

Mumbai Live: मुंबई कडून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहतूक ठप्प

हिंदमाता ब्रिजवर महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाडीचा अपघात झाल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली आहे. या अपघातामुळे मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर आठ ते नऊ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कचऱ्याची गाडी ब्रिजच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला जोरात धडकली, त्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आणि ऑइल गळती सुरू झाली. या प्रकारामुळे संपूर्ण मार्गावर घसरट परिस्थिती निर्माण झाली असून वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

कोरटकर विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

कोरटकर यांच्या विरोधात न्यायालयाच्या बाहेर घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आंदोलन करणाऱ्या या कार्यकर्त्यांनी कोरटकर यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्काळ कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते

Mumbai Live: मुंबई युथ काँग्रेस कॉमेडियन कुणाल कामरासोबत; स्टुडिओ

तोडण्यात आलेला स्टुडिओ मुंबई युथ काँग्रेस बांधून देणार. महाराष्ट्र आणि मुंबईत काय होत आहे. शिवसेना शिंदे गट गुंडागर्दीवर उतरला आहे. पोलीस काय करत आहेत? गृहमंत्री काय करत आहेत? कुणाल कामराने कुणाचंही नाव घेतलेलं नाही. यांना कसं समजलं की यांनाच तो बोलला आहे. स्टुडिओमध्ये झालेली तोडफोड ही निंदनीय आहे. नागपूरमध्ये दंगल झाली आपण त्यांनी काहीही केलं नाही. मुंबईत देखील असंच होत आहे आपण काहीच करू शकत नसेल तर खुर्ची सोडा, असं मुंबई युथ काँग्रेस अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

Beed Live : बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांचं निलंबन

बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी विधानसभेत याची घोषणा केली. कोविड काळातील भ्रष्टाचारप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे.

MNS Live Updates: महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे बृहन्मुंबई महानगरपालिका इ विभाग कार्यालयावर धडक मोर्चा
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे बृहन्मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालयावर धडक मोर्चा

  • फेरीवाला हटवा कामाठीपुरा वाचवा

  • कामाठीपुरा एसपी रोडवर पसरलेल्या अनधिकृत फेरीवाला विरोधात धडक मोर्चा

PM Modi Live Updates: 30 मार्च रोजी आकाशवाणीवर 'मन की बात' कार्यक्रम होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 मार्च रोजी आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या 'मन की बात' कार्यक्रमासाठी नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत हा या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा 120 वा भाग असेल लोक आपले विचार आणि सूचना टोल-फ्री नंबर 1800-11-7800 वर देऊ शकतात

Dharavi Live : धारावी सिलिंडर स्फोट प्रकरणात 8 जणांवर गुन्हा

धारावी सिलिंडर स्फोट प्रकरणात सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Live : पुण्याच्या भोर तालुक्यात पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले सुरूच

भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील कुडली बुद्रुक येथे बिबटयाच्या हल्ल्यात एका गायीचा मृत्यू. माळरानावर जनावरं चरत असताना, बिबट्यानी त्यातील एका गाईवर हल्ला करत गाईला जखमी करत केले ठार

Kunal Kamra LIVE : आपण धमक्यांना घाबरत नाही म्हणत कॉमेडियन कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडावर भाष्य करून वादाच्या भोवऱ्यात कॉमेडियन कुणाल कामरा सापडलाय. त्याच्या स्टुडिओची देखील शिवसैनिकांनी तोडफोड केलीये. तर, त्याने माफी मागावी अशी मागणी शिवसैनिकांची आहे. यावर कुणाल कामराने आपण माफी मागणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली असून याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तसेच तपास यंत्रणा, कोर्टाला सहकार्य करणार असून आपण धमक्यांना घाबरत नसल्याचंही कामराने म्हटलंय.

New Zealand Earthquake LIVE : न्यूझीलंडमधील साउथ आयलंडच्या पश्चिम किनाऱ्यावर ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

आज सकाळी ७.१३ वाजता न्यूझीलंडमधील साउथ आयलंडच्या पश्चिम किनाऱ्यावर ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे.

Prashant Koratkar LIVE : वैद्यकीय तपासणी करून प्रशांत कोरटकरला आज 11 वाजता न्यायालयात हजर केलं जाणार

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला काल कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने तेलंगणा राज्यातील मंचरियाल येथून ताब्यात घेऊन पोलिसांचे पथक आज सकाळी कोल्हापुरात दाखल झालंय. सकाळी तब्बल 10 ते 15 तासांचा प्रवास करत कोल्हापूर पोलिसांचे पथक सकाळी साडेसात वाजता कोल्हापुरात दाखल झालं. आज सकाळी आठ वाजता त्याला जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आणले जाणार आहे. कोरटकर सोबत परिक्षीत नावाचा सहकारी पोलिसांच्या ताब्यात आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणून त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून कोरटकरला ११ वाजता न्यायालयात करणार हजर केले जाणार आहे. 

Nagpur Riots LIVE : नागपूर दंगलप्रकरणी आणखी तिघांना अटक, आरोपींची संख्या पोहोचली 113 वर..

नागपूर दंगल प्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपींची संख्या 113 वर पोहोचली आहे. त्यात 12 अल्पवयीनांचा समावेश आहे. नागपूर शहरातील नंदनवन परिसरातून या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Ajit Pawar VS Sharad Pawar : राष्ट्रवादी कोणाची? अजितदादा की शरद पवारांची? सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

राज्यात शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे अनेकांना धक्का बसला असतानाच, आता राष्ट्रवादीमध्ये देखील अजित पवार यांनी बंडखोरी करत पक्ष फोडला. त्यामुळे राष्ट्रवादी कोणाची? यावरून कायदेशीर लढाई सुरू असून आज (ता. 25) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी दुपारी 12 नंतर होणार आहे.

Ichalkaranji Rain LIVE : इचलकरंजी, पन्हाळ्यासह कागलमध्ये पाऊस

इचलकरंजी : शहरात सोमवारी रात्री काही भागात पावसाने हजेरी लावली. हलकी एक सर येऊन गेली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील यशवंत कॉलनी, कोल्हापूर नाका, जवाहरनगर, स्टेशन रोड, गणेशनगर, शहापूर या परिसरात पाऊस झाला. मात्र शहराच्या बहुतांश भागात पावसाचा एकही थेंब पडला नव्हता. पावसाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे हवेत थोडासा गारवा निर्माण झाला होता.

Prashant Koratkar LIVE : प्रशांत कोरटकरला तेलंगणातून घेऊन येणारं पोलिसांचं पथक कोल्हापूरच्या हद्दीत पोहोचलं

कोल्हापूर : प्रशांत कोरटकरला तेलंगणातून घेऊन येणारं पोलिसांचं पथक कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत पोहोचलं असून काही वेळातच प्रशांत कोरटकरला राजवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात येणार आहे.

Supreme Court LIVE : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. यशवंत वर्मांच्या बदलीवर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

Latest Marathi Live Updates 25 March 2025 : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या विडंबन काव्याचे आणि त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित स्टुडिओच्या केलेल्या तोडफोडीचे विधानसभेत पडसाद उमटले. कामराने माफी मागावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळल्या. मंचरियाल (तेलंगण) येथून काल दुपारी त्याला ताब्यात घेतले. घरात कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडल्याच्या आरोपावरून चर्चेत आलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. यशवंत वर्मा यांच्या अलाहाबाद उच्च न्यायालयातील बदलीवर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सोमवारी शिक्कामोर्तब केले. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा तारखेनुसार येणारा वाढदिवस २४ मार्च रोजी असतो; परंतु मंत्री मुश्रीफ यांच्यासह कार्यकर्ते हा वाढदिवस तिथीनुसार म्हणजेच रामनवमीलाच साजरा करतात. दरम्यान, वाढदिनी मुश्रीफ यांनी अयोध्यानगरीत पोहोचत प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेतले. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात आता बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.