यंदा गुढीपाढवा ३० मार्च २०२५ ला साजरा होणार आहे. जर तुम्ही देखील नऊवारी साडीवर नथ परिधान करण्याचा विचार करत असाल, तर नथचे ट्रेंडी डिझाईन नक्की ट्राय करा.
सण असो व लग्नसमारंभ महिला पारंपरिक पेहराव्याला प्राधान्य देतात. त्यातल्या त्यात नऊवारी साडीवर आवडीने नथ घालतात.
पूर्वीपासून चालत असलेली नथ म्हणजे ब्राह्माणी नथ यालाच मोत्याची नथ म्हणून ओळखले जाते. कोणत्याही प्रकारच्या चेहऱ्यावर अगदी उठून दिसते.
कारवारी नथ हे एक महत्त्वाचे डिझाईन आहे जे विशेषतः महाराष्ट्रातील महिलांमध्ये लोकप्रिय आहे.त्यात वापरलेली चांदी आणि गोट्यांचे काम ही नथला एक खास लुक देतात.
पेंडल नथ ही एक ट्रेंडी आणि हलकी नथ आहे, जी सध्या अनेक महिलांच्या पसंती आहे. पेंडल नथ तुमच्या नऊवारी साडीच्या सौंदर्यात वेगळेपण आणते.
जर तुम्ही अधिक ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसायचं, तर हीरा व मोती असलेल्या नथ परिधान करा.