BCCI announces annual player retainership 2024-25 for Indian Womens Team: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२४-२५ हंगामासाठी करारबद्ध केलेल्या ची यादी जाहीर केली आहे. हा करार १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीसाठी मर्यादित असणार आहे. एकूण १६ खेळाडूंना भारताच्या प्रमुख महिला संघाचा करार मिळाला आहे. ज्यामध्ये एकूण ३ खेळाडूंना 'अ' श्रेणी, ४ खेळाडूंना 'ब' श्रेणी आणि एकूण ९ खेळाडूंना 'क' श्रेणीचा करार मिळाला आहे.
त करारबद्ध होणाऱ्या खेळाडूंना जास्तीत जास्त ५० लाख व कमीत कमी १० लाख वार्षीक करार मिळतो. 'अ' श्रेणीतील खेळाडूंना एकूण ५० लाख रूपये वार्षीक पगार मिळतो. तर, ब' श्रेणीतील क्रिकेटपटूंना ३० लाख व 'क' श्रेणीतील क्रिकेटपटूंना १० लाख वार्षीक पगार मिळतो. त्याचबरोबर भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूला १५ लाख रूपये मॅच फी मिळते. वन-डे सामन्यासाठी ६ लाख व टी-२० सामन्यासाठी ३ लाख रूपये मॅच फी मिळते.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे २०२४-२५ वर्षात भारतीय संघात पदार्पण केलेल्या क्रिकेटपटूंपैकी अवघ्या एकाच क्रिकेटपटूला बीसीसीआयचा करार मिळाला. तर यावेळी हर्लिन देओलला बीसीसीयचा करार मिळाला नाही. 'क' श्रेणी करार मिळालेल्या ९ खेळाडूंमध्ये पुढील खेळाडूंचा समावेश आहे. यास्तिका भाटीया, राधा यादव, श्रेयंका पाटील, तितास साधू, अरुंधती रेड्डी, अमनजोत कौर, उमा चेत्री, स्नेह राणा, पूजा वस्राकर.
तर, जेमिमाह रॉड्रीग्स, रेनुका ठाकूर, रिचा घोष, शेफाली वर्मा या ४ प्रमुख खेळाडूंना ब श्रेणीत करारबद्ध करण्यात आले आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना आणि अष्टपैलू दिप्ती शर्माला 'अ' श्रेणीचा करार मिळाला आहे.