Sonu Sood Wife Car Accident : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. सोनूची पत्नी सोनाली सूदला गंभीर दुखापत झाली आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात आज (२५ मार्च २०२५) रोजी घडला आहे. सोनालीच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने या घटनेची माहिती दिली आहे. अपघाताचे काही फोटोदेखील समोर आले आहेत.
समृद्धी महामार्गावरुन सोनाली तिची बहीण आणि बहिणाचा मुलासह प्रवास करत होती. त्याच वेळेस कारचा अपघात घडला. या दुर्घटनेमध्ये सोनाली आणि तिच्या बहिणीचा मुलगा जखमी झाले. त्यांना नागपुरातल्या एका रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सध्या दोघांवर नागपुरमध्ये उपचार सुरु असल्याचे म्हटले जात आहे.
रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली आणि तिच्या बहिणीचा मुलगा सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. या अपघातात सोनालीच्या बहीणीला किरकोळ दुखापत झाल्याचे समोर आले आहे. घडलेल्या या अपघाताची सर्वत्र चर्चा होत आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास सुरु आहे.
अभिनेता हा अभिनयासह समाजकार्यामध्येही सक्रीय आहे. करोना काळामध्ये त्याने अनेक गरजूंना मदत केली. होती. सोनाली देखील या समाजकार्यात सोनू सूदला मदत करते. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये ती सहभागी होते. मनोरंजन विश्वामध्ये रमायला तिला आवडत नसल्याने ती लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करते.