पिंपरी, ता. २५ ः चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळातर्फे गुरुवारपासून (ता. २७) पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव आयोजित केला आहे. पिंपरी-चिंचवड लिंक रस्त्यावरील बुकॉऊ वुल्फ कॉलनीतील स्वामी समर्थ मठाच्या प्रांगणात कार्यक्रम होतील, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे यांनी दिली.
उत्साहामध्ये गुरुवारी (ता. २७) पहाटे ४.३० वा. ः ‘श्रीं’चा पंचामृत अभिषेक व पूजा. ६ वा. ः कलश स्थापना उत्सव प्रारंभ. सायंकाळी ६ वा. ः अवधूत गांधी यांचे गायन. शुक्रवार (ता. २८) ः सायंकाळी ६ वा. ः भक्तिगंधर्व मुकुंद बादरायणी यांची अभंगवाणी. शनिवार (ता. २९) ः सायंकाळी ६ वा. ः मानसी बडवे यांचे व्याख्यान. रविवार (ता. ३०) ः सायंकाळी ६ वा. ः योगेश तपस्वी यांची भक्तिगीते. सोमवार (ता. ३१) ः सायंकाळी ६ वा. ः सुयश खटावकर यांचा गीतांचा कार्यक्रम होईल. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी, स्वामी समर्थ शक्तिपीठाचे डॉ. गणेश शिंदे, श्री शंकर महाराज गोशाळेच्या अनिता जोगड आणि श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे संस्थापक त्रिंबक भट यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल.
---