मुंबई : ‘‘कामरा याने व्यंगात्मक गाणे केले नाही, ते सत्यात्मक गाणे केले आहे. त्याने जनभावना मांडल्या आहेत. आम्ही आजही बोलत आहोत. चोरी करतात ते गद्दार आहेत. काल कुणाल कामराच्या ठिकाणी केलेली तोडफोड शिवसैनिकांनी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केली नाही. त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही,’’ असे सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॉमेडियन कुणाल कामरा याचे समर्थन केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुपारी घेऊन बोलतात या वक्तव्याचासुद्धा ठाकरे यांनी समाचार घेतला. मग नागपूरची, थडग्याची सुपारी कोणी दिली, गद्दारांचे उदात्तीकरण मान्य आहे का, अशी विचारणा त्यांनी केली. तथाकथित गद्दार नेत्याचा अपमान झाला असे वाटले आणि तोडफोड केली. यांना शिवरायांचा अपमान करणारा कोरटकर, राहुल सोलापूरकर दिसत नाही. कोश्यारींचा निषेध दिसत नाही. हे भेकड, हे गद्दार असल्याची जनभावना असल्याचे ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले...न्याय सारखाच पाहिजेत
नागपूरप्रमाणे तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करून कामराच्या जागेची नुकसानभरपाई दिली पाहिजे
छत्रपतींचा अपमान चालतो, गद्दारांचा चालत नाही. त्यांच्याकडून दामदुपटीने वसूल करावी