कुडाळात क्षय रुग्णांना औषध संच
esakal March 26, 2025 11:45 PM

swt26.jpg
53596
कुडाळः रोटरी क्लबतर्फे रुग्णांना औषधे संच वाटप करताना डॉ. संजय केसरे. बाजूला राजीव पवार, राकेश म्हाडदळकर, डॉ. सुशांता कुळकर्णी, डॉ. जाधव आदी. (छायाचित्रः अजय सावंत)

कुडाळात क्षय रुग्णांना औषध संच
रोटरी क्लबचा पुढाकारः जागतिक क्षयरोग दिनानिमित्त उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ः आपला देश ‘टीबी''मुक्त होऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षल जाधव यांनी केले. रोटरी क्लब ऑफ कुडाळमार्फत जागतिक क्षयरोग दिनानिमित्त तालुक्यातील सहा रुग्णांना सहा महिन्यांसाठी औषधसंच वाटप करण्यात आला.
रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने येथील महिला व बाल रुग्णालयात सोमवारी (ता. २४) क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. समाजात टीबी या आजाराविषयी जागृती व्हावी, या आजाराची लक्षणे, उपचार, निदान समजावून सांगण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. कार्यक्रमामध्ये जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जाधव, रोटरी क्लब अध्यक्ष व इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. संजय केसरे, टीबी विभागाचे सुरेश मोरजकर, लक्ष्मण कदम, महिला बाल रुग्णालय अधीक्षक डॉ. भावना तेलंग, डॉ. सुशांता कुळकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता पराडकर, रोटरीचे सचिव राजीव पवार, राकेश म्हडदळकर, आशा स्वयंसेविका तसेच ग्रामस्थ, नागरिक आणि रुग्ण उपस्थित होते. टीबी निक्षय मित्र या कार्यक्रमांतर्गत उपचार घेणाऱ्या टीबी रुग्णांना फूड बास्केटचे वितरण कुडाळ रोटरी क्लबतर्फे करण्यात आले.
मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली डिपार्टमेंट भारत सरकार यांच्यावतीने कुडाळ रोटरी क्लबला सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन प्रकाश तेंडुलकर यांनी, आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिरोडकर यांनी मानले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.