पिंपरी, ता. २७ : शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासासाठी दररोज खेळणे महत्त्वाचे असते. मुलांच्या स्थूल स्नायूंच्या विकासासाठी कारक कौशल्याधारित खेळांचे ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्र पूर्व प्राथमिक विभागाच्यावतीने आयोजन केले आहे. शनिवारी (ता.२९) विद्यार्थी कारक कौशल्यांचे सादरीकरण करणार असल्याची माहिती मार्गदर्शक शिवराज पिंपुडे यांनी दिली आहे. निगडी येथील शाळेतील मनोहर सभागृहातील मैदानात दुपार चार वाजता कार्यक्रमास सुरूवात होईल. यावेळी ओंकार राष्ट्रदेव विद्यालय संस्थेचा संस्थापक नरहरी वाघ, जनहित प्रतिष्ठान बारामती गुरुकुलच्या स्नेहल भिडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. संयोजन केंद्रप्रमुख मनोज देवळेकर, कार्यक्रम प्रमुख साक्षी परदेशी, विभाग प्रमुख वैशाली तळेगावकर यांनी केले आहे.