सोशल मीडियावर सक्रीय असणारे नियाज खान हे अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात सापडतात. जाणून घेऊयात कोण आहेत नियाज खान?
ते नेहमी हिंदू-मुस्लिमबाबत विधान करत असतात. अशातच सोशल मीडियावर त्यांची एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.
त्यांनी ‘ब्राह्मण द ग्रेट’, आणि ‘वॉर ऑफ कलियुग’ अशी पुस्तके लिहिली आहेत. ‘ब्राह्मण द ग्रेट’, या पुस्काचा संदर्भ घेत त्यांनी त्यांच्या 'X' या प्लॅटफाॅमवर पोस्ट केली.
पोस्ट करत लिहिली की, मी ब्राह्मणांचे नाव घेतल्यावर लोकांना राग का येतो.ते यहुदी म्हणजेच ज्यू लोकाप्रमाणे सुपर जीनियस आहेत. एकटा ब्राह्मण अनेक हजार लोकांच्या बरोबर आहे.
'इतिहास बदलण्यासाठी ब्राह्मणांनी महत्वाची योगदान आहे. त्यांना वेगळे केले तर देशाचे मोठ नुकसान होईल. ब्राह्मण हे आध्यात्मिक गुरु आहेत, असे नियाज खान म्हणतात.
नियाज खान मध्य प्रदेशमध्ये राज्य सेवेचे प्रशासकीय अधिकारी होते.
त्यांनी आतापर्यंत सात कांदबऱ्या लिहिल्या असून एका कांदबरीवर वेबसिरीज बनवण्यात आली आहे,
राज्य सेवेतील अधिकारी म्हणून सेवा करणारे नियाज खान यांना 2015 मध्ये IAS म्हणून बढती मिळाली. सध्या ते नियाज खान मध्य प्रदेशच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत आहेत.