आम्ही दिलेलं आश्वासन आम्ही पूर्ण करु, कर्जमाफीच्या अजित पवारांच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदेंनी
Marathi March 29, 2025 08:24 PM

बारामती: राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर राज्य सरकारने अखेर पाणी फेरलं. महायुती सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं. मात्र, यावर राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारांनी भूमिका जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री पवार शुक्रवारी (ता.28) माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी पीक कर्जाचे पैसे बँकेत भरा, असं अजित पवारांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. अशातच विरोधकांनी देखील अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे, याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती सांभाळत सगळ्या मागण्या पूर्ण करू असंही शिंदेंनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारं आमचं सरकार आहे. मी मुख्यमंत्री असताना16000 कोटी रुपये वेगवेगळ्या गोष्टींसाठी दिले. 45 हजार रुपये टोटल जोडधंदे आणि बाकी कामांसाठी दिले. आम्ही जे बोललो आहोच, जे आश्वासन दिले आहेत आणि जाहीरनामा दिला आहे. त्या जाहीरनाम्यातला प्रत्येक आश्वासन आम्ही पार पाडू.  त्यात आम्ही कोणतीही प्रिंटिंग मिस्टेक असं म्हणणार नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती सांभाळत सगळ्या मागण्या पूर्ण करू असं एकनाथ शिंदे पुण्यात बोलताना म्हणाले आहेत.

आम्ही दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण करू

आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पंधराशे रुपयांनी सुरू केली. त्याने सरकारची ताकद वाढली आणि ती लोकांनी वाढवली. आम्ही दिलेला आश्वासन आम्ही पूर्ण करू. विरोधकांनी आता सुधारावं, महाराष्ट्राने त्यांना विरोधी पक्ष नेता देऊ शकेल एवढी ही संख्याबळ दिले नाही. आम्ही बोललो ते बोललो, प्रिंटिंग मिस्टेक झाली असं बोलणार आमच्या सरकार नाही. काँग्रेसने कुठे कुठे हरताळ फासला आणि कुठे कुठे आश्वासन दिले हे आधी बघा. विरोधक हे सगळ्यात मोठे थापाडे आहेत. विज बिल माफ केलं होतं आणि सरकार आल्यावर लगेच बिल पाठवले. देवेंद्र फडणवीसअजित पवार आणि मी मिळून या राज्याला देशात एक नंबर वर केले. राज्याला अजून मजबूत करू. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपर्यंत 35 करोड लोकांना दारिद्र्यरेषेच्या वरती घेतले. ८० करोड जनतेला मोफत राशन देतात. लखपती दीदी आणि ड्रोन दीदी योजनेअंतर्गत सुविधा दिल्या जातात. यात फक्त हिंदू नाही तर मुसलमान महिलाही आहे. आमच्या सरकारच्या सगळ्या योजना सर्व धर्मीयांना मिळते. त्यामुळे त्यांना दुःख होते, असंही शिंदे म्हणालेत.

सतत होणाऱ्या महापुरुषांच्या अपमानाबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, महापुरुषांचा मान राखला पाहिजे आणि महापुरुषांवर जो कोणी बोलेल त्याला सोडलं जाणार नाही. त्यासाठी आवश्यकत असेल तर कडक कारवाई आणि कायदे केले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पीक कर्जाबाबत काय म्हणालेत अजित पवार?

उपमुख्यमंत्री पवार शुक्रवारी (ता.28) माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी पीक कर्जाचे पैसे बँकेत भरा, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, जे सांगितलं ते प्रत्यक्षात येत नाही, असं म्हणत अजित पवारांनी अर्थसंकल्पातील तरतुदीची जाहीर सभेत उजळणी करून दाखवली. पवार म्हणाले, पीक कर्जाचे ३१ मार्चपूर्वी पैसे भरा. जे सांगितलं ते प्रत्यक्षात येत नाही. त्यामुळे परिस्थितीनुरूप निर्णय घ्यावा लागतो. यावर्षीचे आणि पुढच्या वर्षीचे पीक कर्ज भरा.” असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.