सेन्सेक्स अद्यतन मुंबई: आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1 एप्रिलला बाजारात हाहाकार पाहायला मिळाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्सची सुरुवात 1000 अंकाच्या घसरणीने झाली. आज सुरुवात घसरणीने झाल्यामुळे दिवसाचा शेवटही घसरणीनेच होण्याची चिन्हं दिसत आहे. अमेरिकी प्रशासनाकडून प्रतिस्पर्धी देशांवर टेरिफ लावण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्याचाच परिणाम जगभरातील शेअर बाजारत जाणवत आहे.
या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी भारतीय बाजाराच्या सुरुवातीलाच नकारात्मकता दिसली.
मुंबई शेअर बाजार 76,882.58 अंकांनी उघडला. आज 1 एप्रिलला सुमारे 10 वाजून 35 मिनिटांनी 981 अंकांच्या घसरणीसह तो 76,434 वर स्थिरावला होता. तर निफ्टीमध्ये 50 अंकांच्या घसरणीसह तो 7230 वर स्थिरावला आहे.
या पाच महत्त्वाच्या घटकांबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे भारतीय शेअर बाजाराची दिशा बदलली:
अमेरिकेतली ट्रम्प प्रशासनाकडून एप्रिलमध्ये लावण्यात येणाऱ्या टॅरिफबाबत जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये मोठी चिंता आणि भीती आहे. ब्लूमबर्गच्या मते, ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी फॉक्स न्यूजला सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प प्रतिस्पर्धी टॅरिफ प्लॅनबाबत बुधवारी दुपारी 3 वाजता व्हाइट हाऊस रोज गार्डनमध्ये एका कार्यक्रमात माहिती देतील.
राष्ट्रपती ट्रम्प यांनी 2 एप्रिलच्या घोषणेला ‘मुक्त दिवस’ (Liberation Day) म्हटलं आहे. याचा उद्देश अशा व्यापारिक भागीदार देशांना शिक्षा देणे आहे, ज्यांनी त्यांच्या मते अमेरिकेचा फायदा घेतला आहे. ट्रम्प यांनी सूचित केले आहे की, टॅरिफ प्लॅनवर निर्णय घेतला गेला आहे आणि त्यात सर्व देशांचा समावेश आहे. तथापि, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, टॅरिफच्या धोक्यामुळे बाजारात चढ-उतार नक्कीच दिसून येतील, परंतु याचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही, कारण अमेरिकेच्या आयात केलेल्या वस्तूंपैकी अर्ध्याहून अधिक वस्तूंवर टॅरिफ कमी करण्यात येत आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरण समितीची 7 ते 9 एप्रिल दरम्यान बैठक होणार आहे. यामध्ये जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक निर्णय आणि व्याजदरांवर निर्णय घेतला जाईल. असे मानले जात आहे की, आरबीआयकडून 9 एप्रिल रोजी 25 बेसिस पॉइंट्सची घोषणा केली जाऊ शकते.
बाजाराच्या दृष्टीने आता भारतीय कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीचे निकाल महत्त्वाचे आहेत. गेल्या तीन निराशाजनक तिमाहीनंतर असे मानले जात आहे की, चौथ्या तिमाहीच्या निकालात काही सुधारणा दिसून येईल. जर चौथ्या तिमाहीत अपेक्षेप्रमाणे निकाल आले नाहीत, तर मार्चमध्ये झालेली सुधारणा बिघडू शकते. तज्ज्ञांचे असे मत आहे की, २०२५-२६ च्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत महत्त्वपूर्ण सुधारणा दिसून येऊ शकते.
संबंधित बातम्या
अधिक पाहा..