किशोरवयातील मुलींमध्ये ब्रेस्ट पेनचा त्रास जाणवणे, ही सामान्य बाब आहे. कारण या वयात मुलींच्या शरीरात हार्मोनल बदल होत असतात. मात्र, हल्ली बऱ्याच महिलांनाही हा त्रास जाणवतो. कधी कधी हे दुखणं इतके वाढते आणि असह्य होतं की, आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे की काय अशी शंका मनात निर्माण होते. अशावेळी महिलांनी ब्रेस्ट पेन कॅन्सरमुळे होत नाही ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ब्रेस्ट पेनची कारणे वेगवेगळी असू शकतात. तुम्हाला जर ब्रेस्ट पेनचा त्रास असेल तर महिलांनी वेळ न घालवता तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. कारण आपण ब्रेस्टच्या दुखण्याचा कोणत्याही प्रकारे अंदाज बांधू शकत नाही. त्यामुळे आजच्या लेखात जाणून घेऊयात ब्रेस्ट पेन होण्यामागील काही सामान्य कारणे आणि त्यावरील उपचार
पिरीयड, गर्भधारणा, मेनोपॉज यांसारख्या हार्मोनल बदलावामुळे ब्रेस्ट पेन होऊ शकते.
पिरीयडमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे ब्रेस्ट पेन होण्याची शक्यता असते.
गर्भधारणा सुरू झाल्यानंतर सुरूवातीच्या काळात हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांवामुळे ब्रेस्ट पेन होतं.
ब्रेस्ट फीडिंग करताना काही मातांना ब्रेस्ट पेनचा त्रास होऊ शकतो.
योग्य साइजची ब्रा वापरली नाही तर ब्रेस्ट पेनचा त्रास जाणवतो. कारण टाइट ब्रा च्या वापराने त्वचेवर आणि स्नायूंवर ताण येतो, ज्यामुळे वेदना होऊ शकतात.
मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्तीच्या काळात बऱ्याच महिलांना ब्रेस्ट पेनचा त्रास होतो.
ज्या महिला चहा, कॉफी, अल्कोहोलचे जास्त प्रमाणात सेवन करतात.
ब्रेस्टमध्ये फ्लूइड फिल्ड सिस्ट वाढल्यास वेदना सुरू होतात.
ब्रेस्टला झालेल्या दुखापतीमुळे किंवा शस्त्रक्रियेमुळे ब्रेस्ट पेन होऊ शकते.
हेही पाहा –