मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी करुणा शर्मा (Karuna Sharma) (मुंडे) यांना दर महिन्याला 2 लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशावरोधात दाखल केलेल्या याचिकेवरती काल (शनिवारी, 29 मार्च 2025) माझगाव सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी धनंजय मुंडे यांचा करुणा शर्मासोबत झालेलं लग्न हे अधिकृत नाही. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही, असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकीलांनी केला. तर पुरावे सादर करण्यासाठी त्यांनी काही वेळ कोर्टाकडे मागून घेतला आहे, तर आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत, असा दावा करुणा शर्मा यांनी केला होता. याचदरम्यान, करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि आपली भेट कशी झाली? करूणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्याबद्दल गोपीनाथ मुंडेंना माहिती होतं का? याबाबत शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर माहिती सांगितली आहे.
गोपीनाथ मुंडे यांना तुमच्या दोघांबद्दल? तुम्ही एकत्रित राहता माहिती होतं का? या प्रश्नावर करूणा शर्मा म्हणाल्या, त्यांंना सगळं माहिती होतं. आम्ही दोघं खूप लहान होतो. प्रेम आणि तरूणापणी असणारा जोश यामध्ये आम्ही जे करायचं ते केलं. मी ब्राम्हण समाजाची होती. त्यामुळे त्यांच्या घरातील लोकांना ते मान्य नव्हतं. पण त्यांना मान्य होतं. मला फक्त माझ्या नवऱ्याशी संबंध होता. माझ्या आईला देखील आमचं लग्न मान्य नव्हतं. माझ्या घरातील लोकांना देखील आमचं लग्न मान्य नव्हतं, असंही करूणा शर्मा यांनी मुलाखतीवेळी सांगितलं आहे.
धनंजय मुंडे आणि त्यांची ओळख कशी झाली यावर उत्तर देताना करुणा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांना मी भेटले तेव्हा माझं वय 16 वर्षे इतकं होतं. इंदौरमध्ये असलेल्या भैय्यू महाराजांच्या आश्रमामध्ये आमची पहिल्यांदा भेट झाली होती. गोपीनाथ मुंडेंसह महाराष्ट्रातले अनेक मंत्री, दिग्गज नेते इंदौरच्या त्या आश्रमामध्ये येत होते. आता त्या महाराजांचा मृत्यू झाला, त्यांनी आत्महत्या केली. मी त्या आश्रममध्ये जात देखील नव्हती, कारण माझा या गोष्टींवर विश्वास नाही. एकदा मी माझ्या आईसोबत गेली असता त्यांची आणि माझी टक्कर झाली आणि आमची ओळख झाली.
करुणा मुंडे पुढे म्हणाल्या की, मी आईसोबत भय्युजी महाराजांच्या आश्रमामध्ये गेले होते, त्यावेळी धनंजय मुंडे आणि माझी टक्कर झाली आणि अपघाताने मी धनंजय मुंडेंच्या प्रेमात पडले. आमच्या नात्याबद्दल गोपीनाथ मुंडेंना सगळं माहिती होतं. माझ्या लग्नाच्या वेळी खूप अडचणी आल्या. धनंजय मुंडेंनी माझ्या आईकडे माझ्यासाठी लग्नाची मागणी घातली होती. परंतु माझे घरचे तयार नव्हते. तरीही आम्ही इंदौरमध्ये लग्न केल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
अधिक पाहा..