Swapnil Joshi: अभिनय आणि निर्मिती विश्वात स्वतःच वेगळं स्थान निर्माण करणारा स्वप्नील जोशी हा कायम विविध कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या स्वप्नील अनेक प्रोजेक्ट्स मध्ये व्यस्त आहे पण यंदाचा गुढी पाडवा आणि नवीन वर्ष तो खास तऱ्हेन साजर करणार आहे.
सध्या " " चित्रपटाचं प्रमोशन करतोय आणि यंदाच नव वर्ष साजर करण्यासाठी स्वप्नील पुण्यात जाणार असून चित्रपटाच्या टीम सोबत हा पाडवा साजरा करणार आहे. स्वप्नील या चित्रपटात अभिनेता आणि निर्माता अशी दुहेरी भूमिका साकारणार असून चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे.
स्वप्नील सांगतो " दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा हा गुढी पाडवा माझ्यासाठी तितकाच महत्त्वाचा आणि खास आहे कारण चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मी गिरगाव, दादर, ठाणे, डोंबिवली इथल्या नववर्ष शोभा यात्रा मध्ये जाऊन सहभाग घेतो आणि तिथला माहोल हा खरंच कमालीचा असतो. नव वर्षाच स्वागत करण्यासाठी छान पारंपरिक अंदाजात सगळेच येतात हा एक उत्सव आहे असं मला वाटतं ! यंदा हा गुढी पाडवा आम्ही सुशीला सुजीत टीम सोबतीने पुण्यात साजरा करतोय. मुंबई सारखा पुण्यात देखील उत्साह असतो आणि तो अनुभवण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत"
कामाचा व्याप असला तरी आपले सणवार मोठ्या दिमाखात साजरे करण्यासाठी स्वप्नील कायम उत्सुक असतो. आता सुशीला - सुजीत सोबतीने स्वप्नील शुभचिंतक या गुजराती चित्रपटात दिसणार आहे.