Celebrity MasterChef: 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या अंतिम फेरीत कोण पोहचले? यांचा पत्ता होणार कट, पाहा VIDEO
Saam TV April 03, 2025 05:45 PM

'सेलिब्रिटी मास्टरशेफ' (Celebrity MasterChef) आता शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपले आहे. दिवसेंदिवस हा शो अधिक रंजक होत जात आहे. शो च्या शेवटच्या टप्प्यात निक्की तांबोळी, अर्चना गौतम, तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, राजीव अडातिया, फैजल शेख हे सेलिब्रिटी पोहचले आहेत. यातील दोन स्पर्धक अंतिम फेरीपर्यंत पोहोचले आहेत. तर चार सेलिब्रिटींवर एलिमिनेशनची टांगती तलवार पाहायला मिळत आहे. कोण झालं सुरक्षित आणि कोणाच्या डोक्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार जाणून घेऊयात.

''मध्ये नुकताच परदेशातील स्ट्रीट फूड बनवण्याचा टास्क पार पडला. या टास्क तीन जोड्यांमध्ये पार पडला. तेजस्वी प्रकाश-गौरव खन्ना, तांबोळी (Nikki Tamboli) -फैजल शेख (Mr. Faisu) , अर्चना गौतम-राजीव अडातिया अशा तीन जोड्या केल्या होत्या. तिन्ही जोड्यांनाही वेगवेगळ्या देशाचे स्ट्रीट फूड बनवायचे होते. यात तेजस्वी प्रकाश-गौरव खन्ना यांनी इंडोनेशियाचे फूड बनवले. निक्की तांबोळी-फैजल शेखला डच आणि अर्चना गौतम-राजीव अडातियाला ब्रिटीश स्ट्रीट फूड बनवले.

परदेशातील स्ट्रीट फूडच्या टास्कमध्ये प्रकाश (Tejasswi Prakash) -गौरव खन्ना यांनी बाजी मारली आणि सोन्याचं नाणे मिळवून दोघेही अंतिम फेरीपर्यंत पोहोचले आहेत. आता निक्की तांबोळी, अर्चना गौतम, राजीव अडातिया आणि फैजल शेख हे चार जण एलिमिनेशनच्या टास्कमध्ये पोहचले आहे. एलिमिनेशन टास्कमध्ये कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणते सेलिब्रिटी अंतिम फेरी पोहचणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

तेजस्वी प्रकाश आणि गौरव खन्ना 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या अंतिम फेरीत पोहचल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेना असा झाला आहे. तेजस्वी प्रकाश आनंदाने ओरडताना, उड्या मारताना दिसत आहे. आता निक्की तांबोळी, अर्चना गौतम, राजीव अडातिया आणि फैजल शेख या चौघांमध्ये ब्लॅक अॅप्रन टास्क होणार आहे. सध्या सर्वत्र 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'ची ट्रॉफी कोण उचलणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.