सध्या हिंदीत 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'ची क्रेझ पाहायला मिळत आहे. या शोचा लवकरच ग्रँड फिनाले पार पडणार आहे. तर आता दुसरीकडे मराठीत कुकिंग शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची धमाकेदार झलक 'स्टार प्रवाह' वाहिनीने दाखवली आहे. आता लवकरच 'शिट्टी वाजली रे' (Shitti Vajali Re) हा नवीन रिअॅलिटी शो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. हा आगळावेगळा शो नेमका कसा असणार कोणते कलाकार यात पाहायला मिळणार जाणून घेऊयात.
'शिट्टी वाजली रे' हा नवनवीन पदार्थचा शो असणार आहे. यात सेलिब्रिटी मास्टरशेफ बनणार आहेत. हे पदार्थ बनवताना कलाकारांची तारांबळ उडणार आहे. तर प्रेक्षकांच्या घरात हास्याचा स्फोट होणार आहे. 'शिट्टी वाजली रे' या धमाकेदार शोचे होस्टिंग करणार आहे. 'स्टार प्रवाह' ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कलाकरांची एक झलक पाहायला मिळत आहे.
'शिट्टी वाजली रे' कार्यक्रमात , विजय पाटकर, आशिष पाटील, प्रियदर्शन जाधव, माधुरी पवार, संकेत पाठक असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहे. 'शिट्टी वाजली रे' च्या या खास व्हिडीओला एक हटके कॅप्शन देण्यात आले आहे. त्यांनी लिहिलं की, "कोण होणार कोणावर भारी? आता होणार फ्री होम डिलिव्हरी! नवीन शो 'शिट्टी वाजली रे'"या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
'शिट्टी वाजली रे' 26 एप्रिल पासून शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता 'स्टार प्रवाह'वाहिनीवर पाहता येणार आहे. 'शिट्टी वाजली रे' या शोमध्ये 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'ची स्पर्धक निक्की तांबोळी पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये काय काय होणार हे पाहण्यासाठी चाहते खूप आतुर असल्याचे दिसत आहे.