Pushpa 3: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ फ्रँचायझीने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले आहे. ‘पुष्पा: द राईज’ आणि ‘पुष्पा: द रुल’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांना भारावून टाकले. ‘पुष्पा 2’ ने जागतिक स्तरावर 1800 कोटींपेक्षा जास्त कमाई करून नवा विक्रम केला. यामुळे या चित्रपटाचा तिसरा भाग ‘पुष्पा 3: द रॅम्पेज’बाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा किंवा नानी यांची एंट्री होणार का? याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
अलीकडेच चेन्नईमध्ये झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शक सुकुमार यांना याबाबत विचारण्यात आले. त्यांनी या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना मजेशीर उत्तर दिले. ते म्हणाले, “2025 मधील सुकुमारलाही याबद्दल माहिती नाही, पण 2026 मधील सुकुमार कदाचित या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल.” त्यांच्या या वक्तव्यावरून असे दिसते की विजय देवरकोंडा किंवा नानी यांचापैकी ‘पुष्पा 3’ मध्ये कोण दिसणार हे अजून ठरले नाही.
‘पुष्पा 3’ च्या तयारीबाबत विचारले असता निर्माते वाय. रवी शंकर यांनी सांगितले की, सध्या दिग्दर्शक एटली आणि त्रिविक्रम श्रीनिवास यांच्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. हे चित्रपट पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे ‘पुष्पा 3’ च्या शूटिंगला आणखी उशीर होण्याची शक्यता आहे.
‘’ मध्ये आणखी कोणते नवीन चेहरे असतील, चित्रपटाची कथा कोणत्या वळणावर जाईल, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, निर्मात्यांनी आधीच स्पष्ट केले आहे की हा चित्रपट भव्यदिव्य असेल आणि प्रेक्षकांना अद्भुत अनुभव देईल. त्यामुळे ‘पुष्पा 3’ साठी चाहत्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार हे नक्की आहे.