MI vs KKR : मुंबई इंडियन्सला कमबॅकची तिसरी संधी, चेन्नई-गुजरातनंतर कोलकात्याचं आव्हान; जाणून घ्या रेकॉर्ड
GH News March 31, 2025 12:07 AM

आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक झाली आहे. कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या स्थितीत काही बदल होताना दिसत नाही. मागच्या पर्वात मुंबईचा संघ तळाशी होता. यंदाही मुंबई इंडियन्स विजयासाठी धडपड करताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सला सुरुवातीच्या दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. पहिल्यांदा चेन्नई सुपर किंग्स आणि नंतर गुजरात टायटन्स पराभूत केलं आहे. आता मुंबई इंडियन्सचा तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाशी होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणाचं पारडं जड आहे याची उत्सुकता लागून आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आतापर्यंत 34 सामने झाले आहेत. मुंबई इंडियन्स कोलकात्यावर भारी पडताना दिसत आहे. 34 पैकी 23 सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आहे. तर 11 सामन्यात कोलकात्याने विजय मिळवला आहे. पण 12 वर्षानंतर कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियममध्ये पराभूत केलं होतं. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला आहे.

मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि रोहित शर्मा यांच्याकडून हवी तशी फलंदाजी झालेली नाही. रायन रिकल्टन अजूनही धावांसाठी धडपड करताना दिसत आहे. तर हार्दिक पांड्याला वानखेडेवर मागच्या पर्वात मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. दुसरीकडे, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघ मैदानात उतरणार आहे. वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकु सिंह अशी तगडी फलंदाजी आहे. सुनील नरीन, वरुण चक्रवर्ती यांच्या खांद्यावर फिरकीची जबाबदारी असणार आहे. हार्षित राणा आणि स्पेन्सर जॉन्सन वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील.

दोन्ही संघाचे खेळाडू

कोलकाता नाईट रायडर्स संघ: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, आंगकृष्ण रघुवंशी, मनीष नॉरजे, एन रॉबनी, लूक, एन रॉबनी, लूक, एन. सुनील नरेन, रोवमन पॉवेल, मयंक मार्कंडे, रहमानउल्ला गुरबाज, चेतन साकारिया.

मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिशेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, मुजीब उर रहमान, सत्यनारायण राजू, रॉबिन मिंज, विल जॅक्स, अश्वनी कुमार, राजेश बावा, बॉस कुमार, राजेश बावा, बॉस, बॉस, बॉस, रॉबिन मिंज, विल जॅक्स. बुमराह, रीस टोपली, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर, कृष्णन श्रीजीथ.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.