अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन कच्चा तेलाच्या खरेदीवर 25 ते 50 टक्के सेकंडरी टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. रशिया-युक्रेनमध्ये युद्ध समाप्तीसाठी प्रयत्न सुरु असताना त्यांनी हे वक्तव्य केलय. जे ठरलय, त्यावर रशियाने अमलबजावणी केली नाही, तर काही उलट-सुलट गोष्टी घडू शकतात. एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आपण संतप्त आहोत, असं ट्रम्प यांनी म्हटलय. युक्रेनमध्ये रक्तपात थांबला नाही, तर रशियन तेलावर आणखी प्रतिबंध वाढवण्याची धमकी त्यांनी दिली आहे. त्याशिवाय रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 25 ते 30 टक्के टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य भारतासाठी खूप महत्त्वाच आहे. कारण भारत 30 टक्क्यापेक्षा जास्त कच्च तेल रशियाकडून विकत घेत आहे. रशियान तेलावर टॅरिफ लागल्यास, भारतालाही मोठ्या टॅरिफचा सामना करावा लागेल. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात रशियन तेलाचा पुरवठा कमी झाला, तर कच्चा तेलाचा पुरवठा कमी होईल. कच्चा तेलाच्या किंमती पुन्हा एकदा 100 डॉलर पार जाऊ शकतात. अमेरिकेने आधीच वेनेजुएलाच्या तेलावर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. इराणच्या तेलावर आधीपासून प्रतिबंध आहेत.
भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये किती वाढ होऊ शकते?
खाडी देशांनी आधीच पुरवठा कमी केला आहे. अमेरिकी ऑईल रिझर्व्ह कमी असण्याशिवाय उत्पादन कमी आहे. याचा परिणाम कच्चा तेलाच्या किंमतीवर होईल. हा सिलसिला दीर्घकाळ चालला, तर भारतात प्रतिलिटर पेट्रोलची किंमत 125 रुपयापर्यंत पोहोचू शकते. सध्या देशाच्या अनेक भागात प्रतिलिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांपेक्षा जास्त आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीचा काय अर्थ आहे? भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये किती वाढ होऊ शकते?
हे 11 टक्के तेल बाजारात येणं आवश्यक
रशियन तेलाचा पुरवठा रोखण्यासाठी कच्चा तेलाच्या आयातीवर टॅरिफ लावण्याची धमकी ट्रम्प यांनी प्रत्यक्षात आणल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाच्या किंमती वाढतील. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमती 73 डॉलर प्रति बॅरलच्या पार गेल्या आहेत. जाणकारांनुसार ट्रम्प यांनी धमकीच्या आदेशावर स्वाक्षरी केल्यास कच्चा तेलाच्या किंमती गगनाला भिडतील. अमेरिकी एजन्सी IEA च्या आकड्यानुसार 2023 मध्ये रशिया प्रतिदिन 10.75 मिलियल बॅरल तेलाच उत्पादन करत होता. जे एकूण उत्पादनाच्या 11 टक्के आहे. हे 11 टक्के तेल बाजारात आलं नाही, कच्चा तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे जातील. अमेरिकेतही कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ पहायला मिळेल. तिथे सध्या हे दर 70 डॉलर प्रति बॅरल आहेत.