IPL 2025 MS Dhoni: एमएस धोनी बाद होताच तरुणीची सनकली, रागाने लाल झाली; व्हिडीओ व्हायरल
Marathi March 31, 2025 03:24 PM

आयपीएल 2025 एमएस डॉन नाही: सांघिक खेळाचे प्रदर्शन केलेल्या राजस्थानने दोन पराभवानंतर आयपीएल 2025 च्या हंगामात पहिला विजय मिळवताना चेन्नईला (Rajasthan Royals vs Chennai Super Kings) सहा धावांनी नमवले. यासह चेन्नईला सलग दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 20 षटकात 9 बाद 182 धावा केल्यानंतर राजस्थानने चेन्नईला 20 षटकांत 6 बाद 176 धावांवर रोखले.

राजस्थान आणि चेन्नईचा (CSK vs RR) सामन्याचा थरार शेवटच्या षटकांपर्यंत रंगला होता. शेवटच्या षटकात चेन्नईलाला जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता होती. महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि रवींद्र जाडेजा क्रीजवर होते, पण नवखा कर्णधार रियान परागने राजस्थानसाठी असा मास्टर स्ट्रोक खेळला की धोनीची जादूही त्यासमोर चालली नाही. रियान परागने (Riyan Parag) राजस्थानसाठी शेवटचे षटक संदीप शर्माकडे सोपवला होता. संदीप शर्माने शेवटच्या षटकातील पहिला चेंडू वाइट टाकला. मात्र दुसऱ्याचं चेंडूत संदीप शर्माने धोनीला बाद केले.

एमएस धोनी बाद होताच तरुणीची रिअॅक्शन व्हायरल, VIDEO: (CSK fan Girl emotional reaction after dismissed MS Dhoni)

एमएस धोनी बाद होताच चेन्नईला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या एका तरुणीची रिअॅक्शन चांगलीच व्हायरल होत आहे. संदीप शर्माच्या गोलंदाजीवर एमएस धोनी मोठा फटका खेळताना बाद झाला. शिमरॉन हेटमायरने एमएस धोनीचा झेल घेतला. यावेळी चेन्नईची चाहती चांगलीच रागवल्याचे दिसले. सदर तरुणी रागाने लाल झाली होती. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

चेन्नईचा सलग दोन सामन्यात पराभव-

आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जला सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले आहे. चेन्नईने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्सने पराभव केला होता, परंतु त्यानंतर आरसीबी आणि राजस्थान रॉयल्सने चेन्नईला हरवण्यात यश मिळवले आहे. सध्या चेन्नईचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये 7 व्या स्थानावर आहे.

संबंधित बातमी:

IPL RR vs CSK Malaika Arora: मलायका अरोरा क्रिकेटपटूला करतेय डेट?; चेन्नई-राजस्थानच्या सामन्यापेक्षा त्या फोटोची चर्चा!

नवख्या रियान परागचा मास्टरस्ट्रोक, एमएस धोनीही चक्रावला; चेन्नईच्या जबड्यातून राजस्थानने सामना खेचला!

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.