म्यानमारमध्ये तिसऱ्या दिवशी भूकंपाचे हादरे बसले आहेत. म्यानमारमध्ये 7रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे.
बीडच्या अर्धामसला गावात मशिदीमध्ये स्फोट, आरोपींना 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी कर्जत येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आमदार रोहित पवार मित्र मंडळ केसरी कुस्ती स्पर्धेचा आज अंतिम सामना खेळला जाणार आहे शिर्डी विमानतळावर आजपासून नाईट लँडिंग सुविधा सुरू होणाररात्री 9 वाजेच्या दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत होणार सुरुवात...
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातअपघातात चालक आणि वाहक गंभीर जखमी . मनोर येथील मुख्यमार्गावर मोठ्या प्रमाणावर ऑइल सांडल्याने सर्विस रोडवर वाहतूक कोंडी . वाडा पालघर रोडवर वाहतूक कोंडी . सुदैवाने उड्डाणपूला खाली प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली . भरधाव टँकर वरील चालकाच नियंत्रण सुटल्याने अपघात .
लोणावळ्यात गुढीपाडवा सणानिमित्ताने शोभायात्रेचे आयोजन. हिंदू सोबत मुस्लिम लोकांनीही घेतला भागहिंदू धर्माच्या नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा या सणाने होते. हिंदू समिती लोणावळा आणि ग्रामीण परिसराच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य रॅली आणि शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत सर्वपक्षीय नेते आणि बंधू भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम समाजाच्या वतीने या शोभायात्रीत सामील झालेल्या सर्व हिंदू बांधवांना शरबतची वाटप करण्यात आले.
Beed News : बीड अर्धमटला येथे जिलेटिनच्या साह्याने मशिदीत स्फोटबीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथे मशिदीत स्फोट घडवून आणला आहे. जिलेटिनच्या साह्याने मशिदीत स्पोट घडवून आणला आहे. ही घटना 29 तारखेच्या मध्यरात्री घडली असून याप्रकरणी दोन आरोपींना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना तलवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर बोधगयेला जाणार; १६,१७ एप्रिल रोजी बोधगया मुक्ती आंदोलनात सहभागी होणारमुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे १६,१७ एप्रिल रोजी बोधगया मुक्ती आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
pune News : गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुण्यात भाजपकडून महाआरतीचं आयोजनआज गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुणे भाजपच्या वतीने महाआरतीच आयोजन करण्यात आलं होतं
या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब करूया सारसबाग सिध्दीविनायकाची महाआरती
पुणे भाजपा पुणे शहर,हिंदू गर्जना प्रतिष्ठान तसेच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थितीत होते.
भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
sadhvi pragya singh thakur : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा रद्द- साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, अधिकृत सूत्रांची माहिती
- साध्वी प्रज्ञासिंह यांची प्रकृती अस्वस्थतेच्या कारणास्तव साध्वी यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती
PM नरेंद्र मोदी यांचं दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनPM नरेंद्र मोदी यांनी आज दीक्षाभूमीला भेट दिली. त्यांनी दीक्षाभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं.
Palghar : मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावरपालघर मधीलमनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर . मनसैनिकांना गुढीपाडवा मेळाव्यासाठी आव्हान करणाऱ्या बॅनर वरील मनसे नेते अविनाश जाधव यांच्या फोटोला फासलं काळ. पालघरच्या बोईसर मधील ओसवाल परिसरात लागलेल्या बॅनर वरील फोटोला काळं फासलं . पालघर मधील मनसे पदाधिकाऱ्यांनी काळ फासल्याची माहिती .
PM Modi Nagpur Visit : PM मोदींच्या हस्ते 'सोलार डिफेन्स अँड एअरोस्पेस' कंपनीतील नव्या सुविधांचे उद्घाटन होणारनागपूर दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'सोलार डिफेन्स अँड एअरोस्पेस' कंपनीतील नव्या सुविधांचे होणार उद्घाटन
सोलार कंपनीमध्ये संरक्षण क्षेत्रासाठी लागणारी स्फोटके आणि संबंधित साहित्याची निर्मिती करण्यात येते
सोलार कंपनीमध्ये भारतीय बनावटीच्या UAV ड्रोनची निर्मिती केली जाते.
सोलार कंपनीतील 1250 मीटर लांब धावपट्टीचे पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन
Kalyan News : कल्याण स्टेशनचा पाणीपुरवठा खंडितकल्याण रेल्वे स्टेशनला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन महापालिकेने केली बंद
पाणीपट्टीचे ४ कोटी ४१ लाख रुपये थकवल्याने महापालिकेची कारवाई
वारंवार नोटीसा देऊनही रेल्वेने थकीत रकमेचा भरणा न केल्याने केडीएमसीची कारवाई
Kalyan News: कल्याण स्टेशनचा पाणीपुरवठा खंडितकल्याण -
कल्याण स्टेशनचा पाणीपुरवठा खंडित
स्टेशनला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन महापालिकेने केली बंद
चार कोटी 41 लाख पाणी पट्टी थकविल्याने महापालिकेची कारवाई
वारंवार नोटीसा देऊनही रेल्वे ने थकीत रकमेचा भरणा न केल्याने केडीएमसीची कारवाई
Pune News: पुण्यात झालेल्या संवाद बैठकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत वाद समोरपुणे -
पुण्यातील शिवसेनेत अंतर्गत कलह?
पुण्यात झालेल्या संवाद बैठकीनंतर पक्षातील अंतर्गत वाद समोर
संपर्क मंत्री उदय सामंत यांच्या संवाद बैठकीनंतर शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य
पुण्यातील शिवसेनेत पक्षसंघटना उभी राहत नसल्याची देखील पदाधिकाऱ्यांनी नाराजी केली व्यक्त
पक्षाच्या नावाखाली थेट स्वार्थाची पोळी भाजत असल्याचा पदाधिकाऱ्यांचा सूर
शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांची नाराजी व्हॉट्सॲप ग्रुप मधून समोर
Nashik News: मालेगावात हिंदू संत संमेलनाची तयारी वेगाने सुरूनाशिक -
- मालेगावात हिंदू संत संमेलनाची तयारी वेगाने सुरू
- आयोजकांकडून मंडप उभारणीच काम पुन्हा सुरू
- रात्री पोलिसांनी मंडप काढायला लावल्याची आयोजकांची माहिती
- पोलिसांकडून थांबण्यात आलेले काम पुन्हा सुरू करण्यात आले
- उच्च न्यायालयाने दिलेल्या अटींची पूर्तता करण्याच्या रात्री पोलिसांकडून सूचना
- काही प्रमाणात अटींची पालन करण्यात आल्याचे पोलिसांचे मत
- अतिरिक्त पोलिसांचा खर्च आयोजकांकडून करण्यात येणार वसूल
- पोलिसांकडून आयोजकांना तब्बल 14 लाखांच्या खर्चाची प्रत लेखी दिल्याची माहिती
Nashik News: विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावरनाशिक -
- विधानसभा निवडणुकी नंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर
- नाशिक मध्ये ठाकरे गटाकडून विधानसभा प्रमुखांच्या शिबिराचे योजन
- येत्या १६ एप्रिल रोजी उद्धव ठाकरे करणार नाशिक दौरा
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व
- नाशिक मध्ये आयोजित केलेले शिबिर सत्रात भरविले जाणार वकील आणि टेक्निकल टीम देखील उद्धव ठाकरे यांच्या सोबत शिबिरात मार्गदर्शन करणार
- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती
Mumbai News: गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी विक्रोळीत काढली तब्बल हजार चौरस फुटांची रांगोळीगुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तब्बल हजार चौरस फुटाची रांगोळी काढण्यात आली.
विक्रोळीच्या गणेश मैदानात ही रांगोळी साकारण्यात आली आहे.
या ठिकाणच्या सार्वजनिक उत्सव समिती द्वारा नागरिकांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला.
ही रांगोळी साकारण्याकरिता रांगोळी कलाकार विनोद कोळी यांनी तब्बल 14 तास परिश्रम घेतले
Amravati News: गुढीपाडव्याच्या निमित्ताने अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी गर्दीअमरावती -
गुढीपाडव्याच्या निमित्ताने अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी गर्दी....
नवीन मराठी वर्ष सुख समृद्धीच जावो हे भाविकांकडून अंबा मातेला साकडे...
गुढीपाडव्याच्या निमित्ताने अंबामातेच्या मंदिरात उभारली गुढि.
गुढीपाडव्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं अंबादेवी मंदिरात आयोजन..
Nagpur News: माधव नेत्रालयाशी जोडलेल्या सर्वांचे अभिनंदन - पीएम मोदीनागपूर -
पंतप्रधान नरेंद्र मोदी
"गुढी पाडव्याचा आणि नवीन वर्षाच्या अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा" मराठीतून दिल्या शुभेच्छा...
आज मला इथे येण्याचं भाग्य लाभलं... आजचा दिवस विशेष आहे.
आजपासून नवरात्री पर्व सुरू होत आहे..
भगवान झुलेला यांचा अवतरण दिवस आहे..
100 वर्ष पूर्ण होत आहे..
आज हेडगेवार आणि गुरुजी यांना नमन करण्याचे भाग्य लाभले..
दीक्षाभूमीत जाऊन बाबासाहेब आबेडकर यांना नमन केलेत.
ज्ञान गैरव आणि मानवसेवा ही कणा कणात वास करते,
माधव नेत्रालाय अनेक दशकापासून सेवा करण्याचं काम करत आहे.
लोकांच्या आयुष्यात प्रकाश आला.. नवीन निर्मना झाल्यावर हजारो लोकांच्या आयुष्यात अंधकार सुरू होऊन प्रकाश येईल..
माधव नेत्रालयाशी जोडलेल्या सर्वांचे अभिनंदन करतो..
Pune News: पुण्यातील आप्पा बळवंत चौकातून निघाली शोभायात्रापुणे -
पुण्यातील आप्पा बळवंत चौकात शोभायात्रा निघाली आहे
या शोभायात्रेमध्ये तीन वेगळे रथ
एका रथावर अभिजात मराठी भाषेला दर्जा मिळावा असा हा रथ
शोभायात्रा तांबडे जोगेश्वरी जवळ आली
कोरटकला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलेकोरटकला व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे न्यायालयात हजर करण्यात आले आहे
सरकारी वकील आणि इंद्रजीत सावंत यांच्यातर्फे असीम सरोदे ऑनलाइन उपस्थितीत आहेत
मात्र कोरटकर याचे वकील अद्याप ऑनलाइन हजर झालेले नाहीत त्यामुळे सुनावणीला सुरुवात झालेली नाही
Breaking News: राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये स्फोटराजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये स्फोट
हरीभाऊ बागडे थोडक्यात बचावले
तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉफ्टरमध्ये स्फोट
Nagpur News: लोकांना दृष्टीने देण्याच काम माधव नेत्रालयांकडून केले जात आहे - मुख्यमंत्रीनागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -
मागील अनेक वर्षांपासून माधव नेत्रालयाने अनेकांचा आयुष्यात प्रकाश आणण्याचे काम करत आहे..
लोकांना दृष्टीने देण्याच काम माधव नेत्रालयांकडून केले जात आहे...
माधव नेत्रालयाच मोठं काम या क्षेत्रात आहे,
ईश्वरीय सेवा कार्य असेच सुरू राहिल अश्या शुभेच्छा देतोय.
Pune News: पुणे पोलीस आयुक्तांनी गुढीपाडव्यानिमित्त गुन्हेगारांना दिला सल्ला"गुन्हेगारांनो नवीन वर्षात संकल्प करा आणि सुधरा"
पुणे पोलीस आयुक्तांनी गुढीपाडव्यानिमित्त गुन्हेगारांना दिला सल्ला
शहरात शांतता राहावी यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दगडूशेठ गणपती चरणी केली प्रार्थना
श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी गुढीपाडव्यानिमित्त पोलीस आयुक्तांनी केला अभिषेक
तर पत्नीसह आनंदाची गुढी उभारून
मराठी नववर्षाच्या निमित्ताने पुणे शहरातील गुन्हेगारांनो नवीन वर्षात संकल्प करा आणि सुधरा अशी तंबीच देण्यातवलीय
Nagpur News: PM मोदी यांच्या नागपूर दौरा दरम्यान नरेंद्र मोदी यांचे नागपूर शहरात ठिकठिकाणी स्वागतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौरा दरम्यान नरेंद्र मोदी यांचे नागपूर शहरात ठिकठिकाणी स्वागत
भाजप कार्यकर्त्यांची चौका चौकात स्वागतासाठी मोठी गर्दी ,कार्यकर्त्यां कडून मोदी मोदी च्या जोरदार घोषणा
नरेंद्र मोदी यांचा दौरा आमच्यासाठी आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकी साठी ऊर्जा देणारा असल्याचा कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया
Nagpur News: पीएम नरेंद्र मोदी दीक्षभूमीवर दाखलपीएम नरेंद्र मोदी दीक्षभूमीवर दाखल
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केलं अभिवादन
Nagpur News: पीएम मोदींच्या हस्ते होणार माधव नेत्रालयच्या प्रीमियम सेंटरचे लोकार्पणनागपूर -
नागपुरातील माधव नेत्रालयच्या प्रीमियम सेंटरचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ चालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर संघ चालक मोहन भागवत थोड्या वेळात पोहचतील
Nashik News: नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात आजपासून वासंती नवरात्र उत्सवाला सुरुवातनाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात आजपासून वासंती नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असते..
या निमित्ताने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिराच्या कळसाजवळ शुभचिन्ह अंकित ध्वज लावला जातो..
मंदिरातील पुजारी परिवाराचे संदीप पुजारी हे 70 फूट उंच कळसाजवळ जाऊन आज हा ध्वज लावला.
मंदिरात पहाटेपासूनच महापूजा आणि कळसावर लावण्यात आलेला ध्वज उत्सवाला सुरुवात झाल्याचा संकेत देतो.
Kolhapur News: प्रशांत कोरटकर याला आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणारकोल्हापूर
प्रशांत कोरटकर याला आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार
कोल्हापूर सत्र न्यायालयात कोरटकरला केलं जाणार हजर
आज कोरटकरला विशेष सुट्टीच्या न्यायालयात केलं जाणार हजर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकर यांना पोलिस कोठडी
सूर्यकांत पोवार हे सरकारी वकील, इंद्रजीत सावंत यांच्या मार्फत असीम सरोदे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे युक्तिवाद करणार
कोरटकर याच्या बाजूने सौरभ घाग युक्तिवाद करणार
Nagpur News: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीसाठी रवानानागपूर -
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीसाठी रवाना
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीवर 2017 मध्ये आले होते...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलेशाला अभिवादन करतील, त्यानंतर तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला फुल अर्पण करतील.
Pune News: पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार दगडूशेठ चरणीपुणे -
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार दगडूशेठ चरणी
श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अमितेश कुमार यांचा सपत्नीक अभिषेक
गुढीपाडव्यानिमित्त सपत्नीक अमितेश कुमार बाप्पाच्या चरणी नतमस्तक
PM Narendra Modi: पीएम नरेंद्र मोदी नागपूरमध्ये दाखलनागपूर-
पीएम नरेंद्र मोदी नागपूरमध्ये दाखल
पीएम नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी
ठिकठिकाणी महिला पदाधिकारी आणि बॅनरबाजी करत पाहायला मिळत आहे.