सोन्याची किंमत: सोन्याच्या दरात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासात पुन्हा सोन्याच्या दरातच 1000 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या सोन्याचे दर हे जी एस टी सह 93500 इतक्या विक्रमी उंचीवर जाऊन पोहोचले असल्याचं पाहायला मिळत आहे. याचा ग्राहकांना मोठा फटका बसत आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्याच्या नंतर त्यांनी जाहीर केलेल्या धोरणाचा परिणाम जगाच्या अर्थ व्यवस्थेत होत असल्याच पाहायला मिळत आहे. रशिया युक्रेन युद्धात रशियाने तडजोड करावी अशी अमेरिकेची विनंती रशियाने धुडकावून लावल्याचा परिणाम म्हणून ,पुन्हा एका युद्ध जन्य परिस्थिती कायम राहण्याची शक्यता लक्षात घेता. सुरक्षित गुंतवून म्हणून गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्याच्या कडे वळविल्याने,सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होऊन सोन्याचे दर चोवीस तासात वाढून 92500 वरून 93500 वर जाऊन पोहोचले असल्याचं पाहायला मिळत आहे.
आगामी काळात ही सोन्याचे दर हे अजून वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोन्याचे आजचे दर ऐकून आपल्याला शॉक बसला असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली आहे. सध्या असलेले सोन्याचे भाव हे सर्व सामान्य ग्राहकांसाठी परवडणारे नसल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याचा चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळं सर्वसामान्य नागरिकांना सोनं घेणं परवड नाही. मात्र, दुसऱ्या बाजूला मोठ्या संस्था, श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करताना दिसत आहेत. कारण, सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक नागरिकांना फायद्याची ठरत आहे. कारण दिवसेंदिवस सोन्याचे दर वाढतच आहेत. यामुळं सोन्यात केलेली गुंतवणूक फायद्याची ठरत आहे. दुसऱ्या बाजदुला सर्वसामान्य लोकांना सोन्याची खरेदी करणं शक्य नाही. त्यामुळं सोन्याच्या किंमती कधी कमी होणार असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..