तुळशीच्या पानांमध्ये औषधी तत्व असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, झिंक मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळं तुळस एक नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर म्हणून काम करतं.
तुळशीमध्ये असलेलं कॅम्फीन, सिनेओल आणि युजेनॉल छातीमध्ये साठलेला कफ कमी करण्यास मदत करते. तुळशीच्या पानांचा रस मध, आल्यासोबत घेतल्यास ब्राँकाईटिस, दमा, इन्फ्लुएन्झा, खोकल आणि सर्दीवर गुणकारी असतो.
तुळशीमध्ये असलेल्या फाइटोकेमिकल्समध्ये मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंट्सचे गुण असतात, अशा प्रकारे ते आपल्याला त्वचा, लिव्हर, तोंड आणि फुफ्फुसांच्या कॅन्सरपासून वाचवायला मदत करतात.
तुळस त्वचेवरील डाग, पुरळ दूर करण्यासही मदत करते, यात मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंट असतात. अकाली वृद्धत्वापासूनही तुळशीचं सेवन तुम्हाला वाचवू शकते. केस गळती देखील तुळशीमुळं थांबते.
तुळशीमध्ये दात आणि हिरड्यांना मजबूत करणारे गुण असतात. याशिवाय ते तोंड आल्यानंतर त्यावर गुणकारी म्हणून काम करते. त्यामुळं तोंडाच्या आरोग्यासाठी तुळस चांगली असते.
तुळशीचे अनेक शाररिक आणि मानसिक फायदे देखील आहेत. ताणतणावाच्या काळात तुलशीचं पानी प्यायल्यानं तणाव आणि थकवा दूर होण्यास मदत होते.
तुळस शरिराला डिऑक्सिफाईड करते, त्यामुळं यामध्ये मुत्रवर्धक गुण असतात. शरिरातील युरीक अॅसिड ते कमी करतं, जे किडनीत खडे होण्याचं मुख्य कारण असतं.
तुळशीची पानं काही लोक चावून खातात, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. यामागे वैज्ञानिक कारण हे आहे की, या पानांमध्ये पारा आणि लोह असतं, जे चावल्यानंतरच बाहेर पडतं. त्यामुळं तुमच्या दातांना यामुळं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं पाण्यासोबत घेणं किंवा चहामध्ये उकळून तुळशीची पानं खाण चांगलं असतं.