Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Live: आयपीएल २०२५ मध्ये विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याची तिकीटे खरेदी करताना तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कर भरावा लागत असल्याचे समोर आले आहे.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माला आज प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवताना त्याचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर केला जाईल, अशी खात्री आहे. मुंबईने आज अश्वनी कुमारला पदार्पणाची संधी दिली, तर विल जॅक्सचे पुनरागमन झाले आहे. कोलकाताच्या ताफ्यात मोइन अलीच्या जागी सुनील नरेन परतला आहे.पण, ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात सुनीलचा त्रिफळा उडवला. दीपक चहरने दुसऱ्या षटकात क्विंटन डी कॉकला ( १) माघारी पाठवून कोलकाताची अवस्था २ बाद २ अशी केली.
कर्णधार अजिंक्य रहाणे व अंगकृष रघुवंशी यांनी KKR चा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु तिलक वर्माच्या अफलातून झेलने मुंबईला पुन्हा चांगल्या स्थितीत आणले. अजिंक्य ७ चेंडूंत ११ धावांवर झेलबाद झाला. त्याच्या खेळीत १ चौकार व १ षटकार होता. वेंकटेश अय्यरला झेल अश्वनीने टाकल्याने ने सुटकेचा निश्वास टाकला. पण, सहाव्या षटकात वेंकटेशला ( ३) चहरने माघारी पाठवले. त्यात हार्दिक पांड्याने त्याच्या पहिल्या षटकात अंगकृषची ( २६ ) विकेट मिळवून कोलकाताला ४५ धावांवर पाचवा धक्का दिला.
आयपीएल तिकिटांच्या किमती, करांचे गणितआयपीएलच्या बेसिक तिकिट किमतीवर २५% मनोरंजन कर, १४% CGST आणि १४% SGST लावला जातो. यामुळे तिकिटांच्या मूळ किमतीपेक्षा खूप जास्त पैसे मोजावे लागतात. मात्र, मुंबई इंडियन्सच्या तिकिटावर मनोरंजन कर नाही. चेन्नई सुपर किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात २८ मार्चला झालेल्या तिकिटावर हे तिन्ही कर आहेत. त्यामुळे २३४३.७५ रुपयांच्या तिकिटावर २५% मनोरंजन कर, १४% CGST आणि १४% SGST लागू होतो आणि एकूण किंमत ४००० वर जाते.
तेच मुंबई इंडियन्सच्या तिकिटाचा विचार केल्यास. ३८०० च्या तिकिटावर १४% CGST आणि १४% SGST लावला गेला आहे. त्यामुळे हे तिकिट चाहत्यांना ४८७५ रुपयांना पडतेय.