बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma ) आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आहे. काही काळापूर्वी यांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. यांनी इन्स्टाग्रामवरील एकमेकांचे फोटो देखील हटवले होते. ब्रेकअपच्या चर्चांनंतर तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा रवीना टंडनच्या होळी पार्टीमध्ये स्पॉट झाले. ब्रेकअपच्या चर्चा सुरू असताना विजय वर्माने रिलेशनशिपबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
एका मिडिया मुलाखतीत विजय वर्माने आपले रिलेशनशिपबद्दलचे मत मांडले आहे. त्याने रिलेशनशिपची तुलना चक्क केली आहे. मुलाखतीत विजय वर्मा म्हणाला की, "रिलेशनशिपचा एखाद्या आईस्क्रीमप्रमाणे आस्वाद घ्या. म्हणजे तुम्ही नेहमी आनंदी रहाल. आईस्क्रीममध्ये तुम्हाला कोणताही फ्लेवर मिळो, तो स्वीकारा आणि पुढे चला." विजय वर्माचे हे विधान सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.
तमन्ना भाटिया आणि दोघे एकमेकांना दोन वर्षांपासून डेट करत होते. दोघे कायम एकत्र स्पॉट होत होते. मीडिया रिपोर्टनुसार, तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचा ब्रेकअप झाला असून आता दोघांनी फक्त मैत्रीचे नाते ठेवले आहे. 'लस्ट स्टोरीज २' या वेब सीरिजपासून यांच्या अफेरच्या चर्चा रंगल्या होत्या. कालांतराने यांनी ते एकमेकांना डेट करत असल्याचे कबूल केले. ब्रेकअपच्या चर्चा सुरू होण्याआधी तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा लवकरच बंधनात अडकणार असल्याची चर्चा देखील सुरू होती.
तमन्ना भाटियाला 'स्त्री २'मधील 'आज की रात' या गाण्यामुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. तमन्ना भाटिया आता लवकरच 'ओडेला 2' मध्ये दिसणार आहे. अलिकडेच 29 नोव्हेंबर 2024ला तमन्ना भाटियाचा 'सिकंदर का मुकद्दर' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर विजय वर्माची 'IC 814 -द कंदहार हायजॅक' सीरिज खूपच गाजली. विजय वर्मा आता लवकरच 'मटका किंग' वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे.