World Health Day 2025 : जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व
Marathi April 02, 2025 09:24 PM

जगभरात दरवर्षी जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. 72 वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेची WHO स्थापना झाली होती. त्यामुळे 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. आरोग्य ही माणसाची सर्वात महत्त्वाची आणि अमूल्य संपत्ती आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य दिनी समाजात आरोग्याशी संबंधित समस्या आणि आरोग्यासंबंधित अधिकार याबद्दल आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यात येते. चला तर मग जाणून घेऊयात जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व

जागतिक आरोग्य दिन पहिल्यांदा केव्हा साजरा झाला?

जागतिक आरोग्य दिन पहिल्यांदा 7 एप्रिल 1950 मध्ये साजरा करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यत दरवर्षी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यासाठी एक वेगळी थीम तयार केली जाते.

WHO ची स्थापना –

19 व्या शतकात आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होता. जगभरात विविध साथींच्या आजारांचे थैमान सुरू होते. अनेकांना यात आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी एखादी संस्था असावी असा विचार 1948 मध्ये मांडण्यात आला आणि त्यातूनच पुढे 7 एप्रिल 1950 रोजी डब्लुएओची स्थापना झाली. खरं तर, जन्माला आलेल्या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. या मूलभूत विचारातून जगातील प्रमुख देशांनी एकत्र येत जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना केली आहे.

कोरोनात WHO ची भूमिका

कोविड 19 हे जगावर अचानक आलेलं मोठं संकट होते. मात्र, या काळात जागतिक आरोग्य संघटनेकडून वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करण्यात आले. कोरोनात आरोग्याची काळजी कशी घ्यायची? लस कशी घ्यावी? उपचार कसे घ्यावेत? या बद्दल आरोग्य संघटनेकडून योग्य मार्गदर्शन करण्यात आले होते.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=wuk41j19q4k

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.