रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार खेळाडू विराट कोहली याला बुधवारी 2 एप्रिलला फिल्डिंग करताना हाताच्या बोटाला दुखापत झाली. विराटला या दुखापतीमुळे त्रास झाला. मात्र त्यानंतरही विराट मैदानाबाहेर न जाता फिल्डिंग करत राहिला. मात्र विराटला ज्या पद्धतीने बॉल लागला त्यानुसार त्याला गंभीर दुखापत झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे विराट दुखापतीमुळे खेळू शकणार की नाही? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. आता विराटच्या दुखापतीबाबत आरसीबीचे कोच अँडी फ्लॉवर यांनी अपडेट दिली आहे. विराटला गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात डीप मिड-विकेटवर फिल्डिंग करताना दुखापत झाली. विराटला सीमारेषेवर चौकार अडवताना त्याच्या हाताला बॉल लागला. विराटला फिल्डिंग करताना हाताला बॉलचा जोरात फटका लागला. त्यामुळे विराट विव्हळला. अँडी फ्लॉवर यांनी विराटच्या दुखापतीबाबत काय म्हटलं? जाणून घेऊयात.
“विराट सध्या बरा वाटतोय, तो बरा आहे”, अशी माहिती अँडी फ्लॉवर यांनी पत्रकार परिषदेत दिली. विराटला गुजरात टायटन्सविरुद्ध काही खास करता आलं नाही. विराट अवघ्या 7 धावा करुन आऊट झाला.
दरम्यान गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 8 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. उभयसंघातील सामन्याचं बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आलं होतं. आरसीबीने घरच्या मैदानात 8 विकेट्स गमावून 169 धावा केल्या. तर गुजरातने प्रत्युत्तरात 17.5 ओव्हरमध्ये विजयी आव्हान पूर्ण केलं. गुजरातने 2 विके्टस गमावून 170 धावा केल्या.
विराट कोहली चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग इलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन : साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, आर साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि इशांत शर्मा.