मुंबई : देशातील शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण झाली. मात्र, या पडझडीतही जोस्ट्स इंजिनिअरिंगच्या शेअर्सने तेजी नोंजवली. या लहान कंपनीचे शेअर्स बीएसईवर ८ टक्क्यांहून अधिक वाढून ५५२.८० रुपयांवर बंद झाले. जोस्ट्स इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने मागील पाच दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना ४२ टक्क्यांहून अधिक नफा दिला आहे.
महिन्यात ५० टक्के नफाजोस्ट्स इंजिनिअरिंगचे शेअर्स पाच दिवसांत ३८८.५० रुपयांवरून ५५२.८० रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जोस्ट्स इंजिनिअरिंगच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ६९९ रुपये आहे. तर शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३४०.१५ रुपये आहे.
पाच वर्षांत ८५३ टक्के परतावाजोस्ट्स इंजिनिअरिंगच्या शेअर्सनेमागील पाच वर्षांत ८५३ टक्के परतावा दिला आहे. शेअर्स १ एप्रिल २०२० रोजी ५८ रुपयांवर होते. तर ३ एप्रिल २०२५ रोजी शेअर्स ५५२.८० रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या चार वर्षांत शेअर्समध्ये ८७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जॉस्ट इंजिनिअरिंगचे शेअर्स तीन वर्षांत ५०६ टक्क्यांनी वाढले आहेत. तर दोन वर्षात शेअर्सने ३२१ टक्के नफा दिला आहे. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
स्टाॅक स्प्लिटजोस्ट्स इंजिनिअरिंग कंपनीने अलीकडेच त्यांचे शेअर्स दोनदा विभाजित म्हणजेच स्टाॅक स्प्लिट केले आहेत. कंपनीने एप्रिल २०२३ मध्ये ५ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सचे २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्समध्ये विभाजन केले. या मल्टीबॅगर कंपनीने नोव्हेंबर २०२४ मध्ये २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सचे १ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या २ शेअर्समध्ये विभाजन केले. कंपनीमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा ४८.२६ टक्के तर सार्वजनिक हिस्सा ५१.७४ टक्के आहे. कंपनीचे मार्केट कॅप गुरुवार, ३ एप्रिल रोजी ५५१ कोटी रुपयांच्या पुढे गेले.