तमन्ना भाटिया ही तिच्या अभिनयाबरोबरच परफेक्ट फिगरमुळे नेहमीच चर्चेत असते.
ती नेहमीच तिच्या फिटनेसची काळजी घेत असते. ती नेहमी योग्य आहार घेणं पसंत करते.
दरम्यान तुम्ही सुद्धा तमन्नाचा फिटनेस आणि डाएट प्लान फॉलो करु शकतात.
तमन्ना रोज सकाळी व्यायाम करण्याकडे लक्ष केंद्रित करते. ती तिचा व्यायाम कधीही चुकवत नाही.
ती तिच्या व्यायामामध्ये कार्डिओ आणि फंक्शनल व्यायामाचा सामावेश करते.
कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध टाकून त्याचं ड्रिंक बनवते, आणि ते ड्रिंक पेऊन ती दिवसाची सुरुवात करते.
नाश्त्याला मुख्यत्वेकरुन ती मोड आलेले कडधान्य, इडली, भिजवलेले बदाम असा आहार करते.
दिवसभरात ती फळ, ज्युस, नाराळाचं पाणी यांचा सामावेश करते. तसंच दिवसातून ती 4 लिटर तरी पाणी पिते.
रात्रीच्या जेवणात ती मुख्यत्वेकरून हाय प्रोटिन पदार्थ खाण्याकडे भर देत. त्यात ती मासांहाराची सामावेश करते.