Why Tilak Varma Retired Out: मुंबई इंडियन्सला गरज असताना तिलक वर्मा रिटायर्ड आऊट का झाला? हार्दिक पांड्याच्या उत्तराने बसेल धक्का...
esakal April 05, 2025 06:45 AM

Tilak Varma retired out at a crucial moment in Mumbai Indians vs LSG

मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. लखनऊ सुपर जायंट्सच्या २०३ धावांचा पाठलाग करताना मुंबईला १९१ धावा करता आल्या. संघाला ७ चेंडूंत २४ धावा हव्या असताना ने Retired Out होण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मिचेल सँटनरसाठी त्याने हा निर्णय घेतला, जो कुणालाच पटलेला नाही. सामन्यानंतर हार्दिक पांड्याने सांगितलेलं उत्तर आणखी धक्कादायक होते.

मिचेल मार्श ( ६०), एडन मार्करम ( ५३) यांच्या अर्धशतकाला निकोलस पूरन( १२), रिषभ पंत ( २)चांगली साथ देऊ शकले नाही. आयुष बदोनी ( ३०) आणि डेव्हिड मिलर ( २७) यांनी हातभार लावताना लखनऊला ८ बाद २०३ धावा उभ्या करून दिल्या. ने ( ४-०-३६-५ ) पाच विकेट्स घेऊन इतिहास रचला.

आकाश दीप व शार्दूल ठाकूर यांनी अनुक्रमे विल जॅक्स ( ५) व रायन रिकेल्टन ( १०) या सलामीवीरांना १७ धावांवर माघारी पाठवले. नमन धीर २४ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादवने सुरेख फटकेबाजी करताना ४३ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारांसह ६७ धावा केल्या. हार्दिक पांड्या व तिलक वर्मा संघाला विजय मिळवून देतील असे वाटत होते.

लखनऊच्या गोलंदाजांनी व क्षेत्ररक्षकांनी आधी केलेल्या चुका सुधारल्या आणि मुंबईला धावांसाठी तरसवले. तिलकचा बॅटसोबत नीट संपर्क होत नव्हता आणि त्याने २३ चेंडूंत २५ धावांवर स्वतःला रिटायर्ड हर्ट करण्याचा निर्णय घेतला ७ चेंडूंत २४ धावा असताना त्याने हा निर्णय घेतला आणि तोही मिचेल सँटनरसाठी, याचे सर्वांना आश्चर्या वाटले. हार्दिकने १६ चेंडूंत २८ धावा केल्या, परंतु मुंबईला तो विजय मिळवून देऊ शकला नाही. त्यांना ५ बाद १९१ धावांवर समाधान मानावे लागले.

सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, "हरल्यानंतर निराशा होते. जर आपण प्रामाणिकपणे सांगायचं तर, आम्ही १०-१२ धावा जास्त दिल्या आणि शेवटी आम्ही कमी पडलो.मला माझी गोलंदाजी नेहमीच आवडते. माझ्याकडे जास्त पर्याय नाहीत, पण मी खेळपट्टी वाचतो आणि हुशारीचे पर्याय वापरतो. मी कधीही विकेट्ससाठी जात नाही, पण फलंदाजांना चूक करायला लावण्याचा प्रयत्न करतो. आज असाच एक दिवस होता. फलंदाजी युनिट म्हणून आम्ही कमी पडलो. आम्ही संघ म्हणून जिंकतो, संघ म्हणून हरतो. मी पूर्ण जबाबदारी घेतो.''

तिलक वर्माच्या रिटायर्ड हर्टवर तो म्हणाला,आम्हाला काही मोठे फटके हवे होते, ते त्याला मिळत नव्हते. क्रिकेटमध्ये काही दिवस असे येतात, जेव्हा तुम्ही प्रयत्न करता पण यश येत नाहीत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.