पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या थायलंड दौऱ्यावर जाणार आहेत. आज होणाऱ्या सहाव्या बिमस्टेक परिषदेत ते सहभागी होणार आहेत.
Mumbai Crime Branch: मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 5 आरोपींकडून 7 पिस्तुल जप्तमुंबईतून 7 पिस्तुल आणि 21 जिवंत काडतूसासह 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर अटक केलेले आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांना आहे. विकाश ठाकूर, सुमितकुमार दिलावर, श्रेयस यादव, देवेंद्र सक्सेना आणि विवेककुमार गुप्ता अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी हरियाणा, बिहार आणि राजस्थानमधून आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Waqf Amendment Bill : वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूरअखेर बुधवारी मध्यरात्री वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल संसदेत वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले होते. त्यांनंतर दुपारी 12 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावर सभागृहात चर्चा झाली. त्यानंतर झालेल्या मतदानानंतर वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. यावेळी विधेयकाच्या बाजूने 288 मते पडली. तर, विरोधात 232 मते पडली. मात्र, वक्फ दुरूस्ती विधेयकावरील मतदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मात्र गैरहजर होते.