महाकुंभ मेळ्यात रुद्राक्ष माळांची विक्री करणाऱ्या मोनालिसा सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या सौंदर्यामुळे ती सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि सौंदर्याने दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी तिला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. त्यांचा चित्रपटाचे नाव 'द डायरी ऑफ मणिपूर' असे होते. मात्र आता सनोज मिश्रा चर्चेत आले आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे.
(Monalisa) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिचा चाहता वर्ग आहे. मात्र आता मिश्रा (Sanoj Mishra) यांच्या अटकेनंतर मोनालिसा ढसाढसा रडू लागली आहे. कारण हिरोईन होण्याचे, चित्रपटात काम करण्याचे मोनालिसाचे स्वप्न मोडले आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती खूप रडताना दिसत आहे. या काळात मोनालिसाची तिच्या घरातील सदस्य काळजी घेताना दिसत आहे.
मोनालिसाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये मोनालिसा आणि तिचे कुटुंब एका एका खोलीत बसून कोणाशी तरी बोलताना दिसत आहे. मग घरातून बाहेर पडताच ती ढसाढसा लागते. निरोप घेताना तिच्या डोळ्यातून अश्रू थांबताना दिसत नव्हते. सोबत तिचे कुटुंबीयही तिची काळजी घेताना दिसत आहे. मोनालिसाच्या या व्हिडिओवर लोक खूप कमेंट्सचा पाऊस पडत आहे. मोनालिसाला असे रडताना पाहून तिचे चाहते अस्वस्थ होत आहेत.
मोनालिसा सनोज मिश्राच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. मात्र सनोज मिश्राला अटक करण्यात आली आहे. आता पुढे मोनालिसाचे काय होणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागून आहे.