Powerful IAS Couple : राजकारणामुळे सर्वात पॉवरफुल IAS जोडप्याला घ्यावी लागली व्हीआरएस; अशी होती कारकीर्द…
Sarkarnama April 01, 2025 06:45 PM
VK Pandian, Sujata Karthikeyan पॉवरफुल जोडपे

ओडिशा सरकारमधील पॉवरफुल जोडपे म्हणून व्ही. के. पांडियान आणि सुजाता कार्तिकेयन या आयएएस जोडप्याची ओळख होती. अनेक महत्वाची पदे त्यांनी भूषवली.

VK Pandian व्ही. के. पांडियान

माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी म्हणून पांडियान यांचे नाव घेतले जायचे. त्यांनी दीड वर्षांपूर्वी व्हीआरएस घेत पटनायक यांच्या बिजू जनता दल पक्षामध्ये प्रवेश केला.

VK Pandian, Naveen Patnaik मुख्यमंत्र्यांचे वारसदार

पटनायक यांचे वारसदार म्हणून पांडियान यांच्या नावाची बरीच चर्चा होती. ते अधिकारी असताना सावलीप्रमाणे पटनायक यांच्योसोबत असायचे.

VK Pandian, Sujata Karthikeyan पाय जमिनीवर

पॉवरफुल कपल म्हणून ओळख असून पती-पत्नीचे पाय जमिनीवर होते, असे मानले जायचे. पटनायक यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध असूनही सरकारी कामात ते कधीही जाणवू दिले नाही.

Sujata Karthikeyan सुजाता कार्तिकेयन

सुजाता कार्तिकेयन यांनी व्हीआरएससाठी केलेला अर्ज केंद्र सरकारने नुकताच मंजूर केला. यावेळी त्या फायनान्स विभागाच्या सचिवपदी होत्या.

Sujata Karthikeyan भाजपची सत्ता

ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली आहे. त्याआधी पटनायक यांचाच दबदबा होता. पण सत्ताबदल होताच सुजाता यांनी व्हीआरएस घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

VK Pandian, Naveen Patnaik राजकारणातून संन्यास

राज्यात बीजेडीचा दारूण पराभव झाल्यानंतर पांडियान यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. पराभवाची जबाबदारी घेत राजकारण सोडत असल्याचे त्यांनी जून 2024 मध्ये निकालानंतर जाहीर केले.

VK Pandian राजकारण आडवे?

भाजपची सत्ता आल्यानेच सुजाता कार्तिकेयन यांनी व्हीआरएस घेतल्याचे बोलले जाते. त्यामुळे दोन्ही पती-पत्नीला राजकारणामुळे व्हीआरएस घ्यावी लागल्याची चर्चा आहे.

NEXT : थेट मोदींना आव्हान देत प्रदेश नेतृत्वावर हल्ला; अशी आहे हकालपट्टी झालेल्या आमदार पाटलांची राजकीय कारकीर्द… 
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.