मुंबई : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीसह नवीन आर्थिक वर्ष २०२५-२६ देखील सुरू झाले आहे. या महिन्यात वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये बँका एकूण १६ दिवस बंद राहतील. ४ रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवार व्यतिरिक्त,वेगवेगळ्या ठिकाणी बँका १० दिवस बंद राहतील. या महिन्यात तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल, तर तुम्ही या सुट्ट्या वगळता इतर दिवशी बँकेत जाऊ शकता. एप्रिल महिन्यात तुमच्या राज्यात आणि शहरात बँका कधी बंद राहतील ते जाणून घ्या.
एप्रिल २०२५ मध्ये बँक सुट्ट्यांची यादी१ एप्रिल (मंगळवार) : मेघालय, छत्तीसगड, मिझोराम, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद५ एप्रिल (शनिवार): बाबू जगजीवन राम जयंती (हैदराबादमध्ये बँका बंद)६ एप्रिल (रविवार): साप्ताहिक सुट्टी१० एप्रिल (गुरुवार): महावीर जयंती (अनेक राज्यांमध्ये बँका बंद)१२ एप्रिल (शनिवार): दुसरा शनिवार१३ एप्रिल (रविवार): साप्ताहिक सुट्टी१४ एप्रिल (सोमवार): डॉ. आंबेडकर जयंती आणि इतर प्रादेशिक उत्सव15 एप्रिल (मंगळवार): बंगाली नववर्ष, हिमाचल दिवस, बोहाग बिहू१६ एप्रिल (बुधवार): बोहाग बिहू (गुवाहाटीमध्ये बँका बंद)१८ एप्रिल (शुक्रवार): गुड फ्रायडे२० एप्रिल (रविवार): साप्ताहिक सुट्टी२१ एप्रिल (सोमवार): गरिया पूजा (अगरतळामध्ये बँका बंद)२६ एप्रिल (शनिवार): चौथा शनिवार२७ एप्रिल (रविवार): साप्ताहिक सुट्टी२९ एप्रिल (मंगळवार): भगवान परशुराम जयंती (शिमलामध्ये बँका बंद)30 एप्रिल (बुधवार): बसव जयंती, अक्षय तृतीया (बंगळुरूमध्ये बँका बंद)
ऑनलाइन बँकिंग नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि एटीएम सेवा सुट्टीच्या दिवशीही चालू राहतील. परंतु काही व्यवहारांना विलंब होऊ शकतो, म्हणून महत्त्वाचे आर्थिक काम आधीच पूर्ण करणे चांगले राहील. तुम्ही बँकेत चेक क्लिअरन्स, फंड ट्रान्सफर किंवा रोख रक्कम काढणे असे कोणतेही महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल तर सुट्ट्यांची ही यादी पहा आणि कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आगाऊ नियोजन करा.