Homemade Makeup Remover: आजकाल, लग्न किंवा इतर खास कार्यक्रम असो, लहान मुलींपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजणाना मेकअप करायला आवडते. त्यामुळे मेकअप एक कला बनली आहे, जी प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारे केली जाते.
मेकअप काढण्यासाठी अनेक जण बाजारातील महागडे क्लींजर वापरतात. परंतु, यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात, ज्यामुळे त्वचेला हानी पोहोचू शकते. यामुळे त्वचा काळवंडते किंवा बारीक पिंपळही येऊ शकतात.
पण तुम्ही बाजारातील महागडे क्लींजर न वापरता घरगुती पदार्थ वापरून नैसर्गिक क्लींजर तयार करू शकता. यामुळे चेहरा क्लीन होतो आणि स्किनला ग्लोइंग ठेवण्यासाठी मदत करू शकतात. चला तर मग, जाणून घेऊया त्याबद्दल.
नारळ तेलनारळ तेल देखील मेकअप काढण्यासाठी वापरता येते. यासाठी, कॉटन पॅडवर नारळ तेल घ्या आणि चेहऱ्यावर हलक्या हातांनी मसाज करा. यामुळे मेकअप काढण्यात मदत होईल आणि त्वचा मऊ राहील. विशेषतः ड्राय स्किन असणार्यांसाठी हे एक उत्तम उपाय आहे.
गुलाब पाणी आणि एलोवेरा जेलगुलाब पाणी आणि एलोवेरा जेल हे दोन्ही पदार्थ त्वचेसाठी चांगले असतात. 2 चमचे गुलाब पाणी आणि 1 चमचा एलोवेरा जेल चांगलं मिक्स करा. या मिश्रणाला चेहऱ्यावर लावा आणि ओल्या कापड्याने किंवा कॉटन पॅडने साफ करा. यामुळे मेकअप सहजपणे काढता येईल आणि त्वचा हायड्रेटेड राहील.
कच्च दूधकच्च दूध देखील एक नैसर्गिक क्लींजर आहे. 1-2 चमचे कच्चं दूध घेऊन त्यात कॉटन पॅड बुडवा आणि त्याने चेहरा साफ करा. हे मेकअप काढण्यासाठी आणि त्वचेला नमी देण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हे ड्राय स्किन असणार्यांसाठी विशेषत: फायदेशीर आहे.