ब्रीहानमुंबई महानगरपालिका: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) करनिर्धारण (Tax) आणि संकलन विभागाने मालमत्ता कर संकलनाच्या बाबतीत यंदा विक्रमी कामगिरी केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 2024-25 या आर्थिक वर्षात आजवरचे विक्रमी म्हणजेच 6 हजार 198 कोटी 5 लाख रुपये मालमत्ता कर संकलित झाला आहे. 6 हजार 200 कोटी रुपयांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. अतिरिक्त दंडाच्या स्वरुपात 178 कोटी 50 हजार रुपयांचेही संकलन झाले आहे.
मुंबईकर नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध नागरी सेवासुविधा दिल्या जातात. उत्तमोत्तम नागरी सेवासुविधांची पूर्तता करण्यासाठी विविध आर्थिक स्रोत महत्वपूर्ण ठरत असतात. मालमत्ता करही याच आर्थिक स्रोतांपैकी अत्यंत महत्वपूर्ण स्रोत मानला जातो. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात तसेच सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) श्री. विश्वास शंकरवार आणि करनिर्धारक व संकलक श्री. गजानन बेल्लाळे यांच्या देखरेखीखाली करनिर्धारण व संकलन विभागाच्या वतीने मालमत्ता कर संकलनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले. नागरिकांनी वेळेवर मालमत्ता करभरणा करावा, यासाठी जनजागृती करणे; निर्धारित कालावधीत नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करता यावा, यासाठी साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी नागरी सुविधा केंद्र ठेवणे; करभरणा करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन देणे; मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करणे तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी पाठपुरावा करणे, आदी प्रयत्नांचा यामध्ये समावेश होता.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 6 हजार 200 कोटी रुपये मालमत्ता कर संकलनाचे उद्दिष्ट ठेवले होते. करनिर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे तसेच मुंबईकर नागरिकांच्या सहकार्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी दिनांक 26 मे 2024 ते दिनांक 31 मार्च 2025 या निर्धारित कालावधीदरम्यान 6 हजार 198 कोटी 05 लाख रुपये इतके मालमत्ता कर संकलित करण्यात आले आहे. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या 99.97 टक्के इतके आहे. सोबतच, अतिरिक्त दंडाच्या स्वरुपात 178 कोटी 50 हजार रुपयेही संकलित करण्यात आले आहेत.
प्रशासकीय विभागनिहाय कामगिरीचा विचार करता, दिनांक 26 मे 2024 ते दिनांक 31 मार्च 2025 या आर्थिक वर्षामध्ये जी दक्षिण (624 कोटी 50 लाख रुपये), के पूर्व (568 कोटी 56 लाख रुपये), एच पूर्व (526 कोटी 64 लाख रुपये), के पश्चिम (505 कोटी रुपये) या विभागांनी सर्वाधिक मालमत्ता कर संकलन नोंदवले आहे.
१) ए विभाग – 219 कोटी 12 लाख रुपये
२) बी विभाग – 36 कोटी 33 लाख रुपये
३) सी विभाग – 87 कोटी 83 लाख रुपये
४) डी विभाग – 273 कोटी 46 लाख रुपये
५) ई विभाग – 154 कोटी 16 लाख रुपये
६) एफ दक्षिण विभाग – 135 कोटी 25 लाख रुपये
७) एफ उत्तर विभाग – 163 कोटी 22 लाख रुपये
८) जी दक्षिण विभाग – 624 कोटी 50 लाख रुपये
९) जी उत्तर विभाग – 239 कोटी 40 लाख रुपये
एकूण संकलित कर रक्कम – 1 हजार 933 कोटी 26 लाख रुपये
१) एच पूर्व विभाग – 526 कोटी 64 लाख रुपये
२) एच पश्चिम विभाग – 382 कोटी 74 लाख रुपये
३) के पूर्व विभाग – 568 कोटी 56 लाख रुपये
४) के पश्चिम विभाग – 505 कोटी रुपये
५) पी दक्षिण विभाग – 363 कोटी 87 लाख रुपये
६) पी उत्तर विभाग – 214 कोटी 56 लाख रुपये
७) आर दक्षिण विभाग – 179 कोटी 36 लाख रुपये
८) आर मध्य विभाग – 222 कोटी 10 लाख रुपये
९) आर उत्तर विभाग – 75 कोटी 65 लाख रुपये
एकूण संकलित कर रक्कम – 3 हजार 038 कोटी 49 लाख रुपये
१) एल विभाग – 260 कोटी 62 लाख रुपये
२) एम पूर्व विभाग – 88 कोटी 49 लाख रुपये
३) एम पश्चिम विभाग – 145 कोटी 40 लाख रुपये
४) एन विभाग – 219 कोटी 37 लाख रुपये
५) एस विभाग – 330 कोटी 80 लाख रुपये
६) टी विभाग – 174 कोटी 12 लाख रुपये
एकूण संकलित कर रक्कम – 1 हजार 218 कोटी 79 लाख रुपये
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..