लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात कमबॅक केलं. सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून विजयी ट्रॅकवर परतली आहे. तर पंजाब किंग्सने पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत केलं होतं. आता दुसऱ्या सामन्यात लखनौशी सामना करत आहे. त्यामुळे दोन्ही विजयी लय कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पंजाब किंग्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्सने पॉवर प्लेमध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या दिग्गज खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स टेन्शनमध्ये आली आहे. कारण एकाना मैदानावर मोठी धावसंख्या उभारणं कठीण आहे. त्यामुळे सावध पण चांगली खेळी अपेक्षित होती. पण लखनौच्या फलंदाजांनी वारंवार चुका केल्या. त्याचा फटका पॉवर प्लेमध्ये बसला. सहा षटकात 3 गडी गमवून 39 धावा केल्या. यावेळी मिचेल मार्श, एडन मार्करम आणि ऋषभ पंत स्वस्तात बाद झाले. कर्णधार ऋषभ पंत सलग तिसऱ्या सामन्यात फेल गेला आहे. या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याचा असा फॉर्म पाहून चिंता वाढली आहे.
लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांची बोली लावून ऋषभ पंतला आपल्या संघात घेतलं. दिल्ली कॅपिटल्सने राईट टू मॅचचा पर्याय निवडल्याने लखनौ 27 कोटींची बोली लावली. तेव्हा दिल्ली कॅपिटल्सने नकार दिला आणि पंत लखनौच्या ताफ्यात रुजू झाला. लखनौ सुपर जायंट्सने त्याच्याकडे कर्णधारपद सोपवलं आहे. तसेच त्याच्याकडून फार अपेक्षा आहेत. पण सलग तिसऱ्या सामन्यात फेल गेला आहे. प्लेऑफपर्यंत प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. त्यामुळे ऋषभ पंत तीन फेल गेला आहे. म्हणजेच 27 कोटी रुपयातील 5.76 कोटी वाया गेले असंच म्हणावं लागले. कारण 27 कोटी रुपयांच्या हिशेबाने ऋषभ पंतची फी प्रत्येक सामन्यासाठी 1.92 कोटी रुपये आहे.
ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात खातंही खोलू शकला नव्हता. तेव्हा 6 चेंडूंचा सामना करत खातंही खोलू शकला नाही. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर फाफन त्याचा झेल पकडून तंबूत पाठवलं होतं. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 15 चेंडूत 15 धावा करून बाद झाला होता. तेव्हा हर्षल पटेलने त्याला तंबूत पाठवलं होतं. आता पंजाब किंग्स विरूद्धच्या सामन्यात पुन्हा फेल गेला आहे. 5 चेंडूंचा सामना केला आणि 2 धावांवर असताना ग्लेन मॅक्सवेलने त्याला तंबूत पाठवलं.