आजचे पंचांग आणि दिनविशेष - 2 एप्रिल 2025
esakal April 02, 2025 02:45 PM

पंचांग -

बुधवार : चैत्र शुद्ध ५, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.२९, सूर्यास्त ६.४७, चंद्रोदय सकाळी ९.२०, चंद्रास्त रात्री ११.१२, श्री पंचमी, श्री लक्ष्मी पंचमी, भारतीय सौर चैत्र १२ शके १९४७.

दिनविशेष -

  • १९९८ - कोकण लोहमार्गावरून धावणाऱ्या पहिल्या निजामुद्दीन-तिरुअनंतपुरम या राजधानी एक्स्प्रेसचा शुभारंभ दिल्लीतील निजामुद्दीन स्थानकातून झाला.

  • २०११ - मोहाली येथे श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील अंतिम विश्वकरंडक क्रिकेट सामन्यात टीम इंडियाने विश्वविजेतेपद जिंकून क्रिकेटचे जग जिंकले.

  • २०१५ - अमेरिकेच्या सेरेना विल्यमने मियामी ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना कारकिर्दीतील सातशेव्या विजयाची नोंद केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.