
साहित्य-
मैदा - ३०० ग्रॅम
मोहन टाकण्यासाठी तूप
ओवा - एक टीस्पून
बटाटा: २५० ग्रॅम
हिरव्या मिरच्या- दोन
लाल तिखट- १/३ टीस्पून
धणेपूड - एक टीस्पून
बडीशोप-अर्धा टीस्पून
जिरे- अर्धा टीस्पून
गरम मसाला-एक टीस्पून
तेल
चवीनुसार मीठ
आमसूल पावडर - १/३ टीस्पून
पाणी
ALSO READ:
कृती-
सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात मैदा घ्यावा. आता त्यामध्ये दोन चमचे तूप घाला, अर्धा चमचा मीठ घाला, आता चांगले मिसळा. आता थोडे थोडे पाणी घाला आणि दोन्ही हातांनी मऊ पीठ मळून घ्या, पीठ स्थिर होण्यासाठी १५ मिनिटे तसेच ठेवावे. आता प्रेशर कुकरमध्ये बटाटे वाफवून घ्या. बटाटे थंड पाण्यात टाका आणि सोलून घ्या.बटाटे छोटे तुकडे करा आणि गॅस चालू करा आणि पॅनमध्ये तेल टाकून गॅसवर ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात चिरलेली हिरवी मिरची घाला. आता बडीशेप आणि जिरे घाला. आता त्यात त्यात बटाटे घाला आणि बटाटे चांगले मिसळा आता त्यात मसाले घाला, धणे पूड, लाल तिखट, मीठ घाला आणि चमच्याने मिसळा, आता आमसूल पावडर आणि गरम मसाला घाला, भाजी एक मिनिट शिजवा आणि गॅस बंद करा.आता पिठाचे छोटे गोळे करा, गोळे दाबून मोठे करा, आता तयार केलेली भाजी मध्यभागी असलेल्या गोल जाड पिठाच्या पुरीमध्ये ठेवा आणि चमच्याने व्यवस्थित बंद करा. आता तळहाताने ते थोडे थोडे दाबा. आता पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये तेल घालावे व तेल गरम होऊ द्यावे. तेल गरम झाल्यावर कचोरी घालावी. व सर्व कचोऱ्या तळून घ्या. कचोरी कुरकुरीत राहण्यासाठी आच मध्यम आणि कमी ठेवा. आता तयार कचोरी प्लेटमध्ये काढा. तर चला तयार आहे आपली आलू कचोरी रेसिपी, हिरव्या चाटिणीसोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ:
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: